फलंदाज रॉबिन उथप्पाला भारतीय संघातील स्थान फार काळ टिकवण्यात यश आले नाही. पण, इंडियन प्रीमिअर लीगमध्ये त्याच्या फटकेबाजीनं सर्वांना मंत्रमुग्ध केले आहे. लॉकडाऊनमुळे सध्या तो आपल्या कुटुंबीयांसोबत वेळ घालवत आहे.
रॉबिन उथप्पानं माजी टेनिसपटू शीतल गौतम हिच्याशी लग्न केलं आणि या दोघांना नील नोलन उथप्पा नावाचा मुलगा आहे.
रॉबिन उथप्पाची लव्ह स्टोरी फार रंजक आहे. एकमेकांना आठ वर्ष डेट केल्यानंतर दोघांनी लग्नाचा निर्णय घेतला. पण, रॉबिनला दोन वेळा लग्न करावं लागलं होतं.
2007च्या ट्वेंटी-20 वर्ल्ड कपनं रॉबिनला खरी ओळख दिली. त्यानंतर त्याची आणि शीतलची भेट झाली.
शीतलला लहानपणापासूनच टेनिस खेळाची आवड होती. तिनं राज्यस्तरीय स्पर्धांमध्येही सहभाग घेतला आहे.
शीतल हिंदू आणि रॉबिन ख्रिश्चन आहे. 2009मध्ये एका पार्टीमध्ये दोघांची भेट झाली. एका कॉमन मित्राने त्यांची ओळख घडवून आणली.
पहिल्या नजरेतच रॉबिनला शीतल आवडली आणि त्यानंतर त्यांच्या भेटीगाठी सुरूच राहिल्या. 2014मध्ये दोघांनी प्रेमाची जाहीर कबुली दिली.
पण, दोघांचा धर्म वेगळा असल्यामुळे त्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागला. आपल्या कुटुंबीयांशी न बोलताच रॉबिननं तिला लग्नाची मागणी घातली.
त्यानंतर दोघांनी आपापल्या कुटुंबीयांना समजावले आणि लग्नासाठी परवानगी मिळवली. 2016मध्ये दोघांनी विवाह केला.
पण, त्यांनी ख्रिश्चन आणि हिंदू अशा दोन्ही पद्धतीत विवाह केला. 3 मार्चला त्यांनी ख्रिश्चन, तर 11 मार्चला हिंदू पद्धतीत विवाह केला.