हरमनप्रीत ते लॉरा! वर्ल्ड कप नॉकआउट्समध्ये सर्वोच्च धावा करणाऱ्या टॉप ५ मध्ये फक्त एक पुरुष बॅटर

भारताची हरमनप्रीत कौर सर्वात अव्वलस्थानी

महिला वनडे वर्ल्ड कप स्पर्धेतील नॉकआउट लढतीमध्ये सर्वोच्च वैयक्तिक धावसंख्येचा विक्रम हा भारताची कर्णधार हरमनप्रीत कौर हिच्या नावे आहे. २०१७ च्या हंगामातील ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सेमीफायनलमध्ये तिने विक्रमी खेळी साकारली होती.

२०१७ च्या हंगामात ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या सामन्यात भारतीय महिला संघाची अवस्था २ बाद ३५ अशी असताना हरमनप्रीत कौरनं दमदार खेळीचा नजराणा पेश करताना ११५ चेंडूत नाबाद १७१ धावांची खेळी केली होती.

हरमनप्रीत कौरनं आपल्या आतापर्यंतच्या कारकिर्दीत केलेल्या या सर्वोच्च खेळीत २० चौकार आणि ७ षटकार मारले होते. तिच्या खेळीच्या जोरावर भारतीय संघाने फायनलही गाठली होती.

ऑस्ट्रेलियन कर्णधार एलिसा हीली या यादीत दुसऱ्या क्रमांकावर आहे. २०२२ च्या फायनलमध्ये इंग्लंडविरुद्ध एलिसा हीलीनं नाबाद १७० धावांची खेळी केली होती.

दक्षिण आफ्रिकेची कर्णधार लॉरा वॉल्व्हार्ड हिने इंग्लंडविरुद्धच्या सेमीफायनल लढतीत १६९ धावांची खेळी केली.

वर्ल्ड कप स्पर्धेत सर्वोच्च खेळी करणाऱ्या आघाडीच्या पाच बॅटर्सच्या यादीत अ‍ॅडम गिलख्रिस्ट हा एकमेवर पुरुष खेळाडू असून तो चौथ्या क्रमांकावर आहे. २००७ च्या वनडे वर्ल्ड कप स्पर्धेतील फायनलमध्ये त्याने १४९ धावांची खेळी केली होती.