सुश्मिता सेनला तोडीस तोड सुंदर आहे ललित मोदींची कन्या, त्यांच्या कुटुंबाबत कोण कोण? पाहा

Lalit Modi's Daughter: १४ जुलै रोजी आलेल्या एका वृत्तामुळे अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला होता. ती बातमी होती अभिनेत्री सुश्मिता सेन ही व्यावसायिक ललित मोदी ललित मोदींना डेट करत असल्याची. त्यांनी एकमेकांचे काही फोटो शेअर केले आहेत.

१४ जुलै रोजी आलेल्या एका वृत्तामुळे अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला होता. ती बातमी होती अभिनेत्री सुश्मिता सेन ही व्यावसायिक ललित मोदी ललित मोदींना डेट करत असल्याची. त्यांनी एकमेकांचे काही फोटो शेअर केले आहेत.

सुश्मिता सेन आणि ललित मोदी यांच्यातील अफेअरची बातमी समोर आल्यापासून सोशल मीडियावर वेगवेगळ्या चर्चा सुरू आहेत. या जोडप्याच्या कुटुंबात कोण कोण आहेत, याबाबत जाणून घेण्याची उत्सुकता नेटिझन्समध्ये दिसत आहे.

सुश्मिता सेन ही बंगाली कुटुंबातील आहे. तिचे वडील भारतीय हवाई दलातील माजी विंग कमांडर आहेत. तर तिची आई शुभ्रा सेन ज्वेलरी डिझायनर आहे. दुबईमध्ये तिचा ज्वेलरी स्टोअर आहे.

सुश्मिता सेनचा भाऊ राजीव सेन मॉडेल आणि अभिनेता आहे. त्याची पत्नी चारू असोपा आहे. त्यांना एक मुलगी आहे. मात्र पती-पत्नीमध्ये तणाव असून ते लवकरच घटस्फोट घेणार आहे. तर सुश्मिता सेन हिला दोन मुली आहेत. तिने त्यांना दत्तक घेतलं आहे. ती सिंगल मदर आहे.

सुश्मिता सेनचा बॉयफ्रेंड रोहमन शॉल याच्याशी सुश्मिताचं ब्रेकअप झालं असलं तरी तो सुश्मिताचा मित्र म्हणून कायम आहे. तसेच तो तिच्या कुटुंबाच्याही जवळ आहे. सुश्मिता सेन आणि ललित मोदी यांच्या अफेअरबाबत बातमी समोर आल्यानंतर त्याने त्यांना शुभेच्छा दिल्या होत्या.

ललित मोदींच्या कुटुंबाचा विचार केल्यास त्यांनी १९९१ मध्ये मीनल यांच्याशी विवाह केला होता. मीनल यांचं २०१८ मध्ये कॅन्सरमुळे निधन झालं. या दाम्पत्याची दोन मुलं आहेत. मुलगा रुचीर मोदी आणि मुलगी आलिया मोदी.

मीनल ह्या ललित मोदींपेक्षा १० वर्षांनी मोठ्या होत्या. त्यामुळे या दोघांच्या विवाहाला कुटुंबीयांचा विरोध होता. नंतर कुटुंबीयांनी मान्यता दिली आणि त्यांचा विवाह झाला.

ललित मोदींची कन्या आलिया मोदी हिचा विवाह यावर्षी मे महिन्यात झाला होता. तिच्या लग्नाचे फोटो ललित मोदी यांनी सोशल मीडीयावर शेअर केले होते. ती खूप सुंदर आहे. तसेच सौंदर्याचा विचार केल्यास ती ललित मोदींनी नवी प्रेयसी सुश्मिता सेन हिला तोडीस तोड आहे.

या फोटोममध्ये ललित मोदी त्यांची मुलगी आणि जावयासोबत दिसत आहेत.