श्रीलंकेचा स्टार बॅटर कुसल मेंडिस याने अफगाणिस्तान विरुद्धच्या सामन्यात ५२ चेंडूतील ७४ धावांच्या नाबाद खेळीच्या जोरावर संघाला दिमाखदार विजय मिळवून दिला.
अबुधाबीच्या शेख जायद स्टेडियम रंगलेल्या सामन्यात संघ अडचणीत सापडला असताना त्याच्या भात्यातून मॅच विनिंग फिफ्टी पाहायला मिळाले.
या अर्धशतकी खेळीसह त्याने संघाच्या विजयात मोलाचा वाटा तर उचललाच. पण मोठ्या विक्रमालाही गवसणी घातलीये.
आशिया कप स्पर्धेत सर्वाधिक वेळा फिफ्टी प्लस धावसंख्या करणाऱ्या फलंदाजांच्या यादीतील भारतीय टी-२० संघाचा माजी कर्णधार रोहित शर्माचा विक्रम त्याने मोडीत काढला आहे.
रोहित शर्मानं टी-२० प्रकारातील आशिया कप स्पर्धेत दोन वेळा ५० पेक्षा अधिक धावा केल्या आहेत. त्याचा हा विक्रम कुसल मेंडिसन मोडीत काढलाय. त्याच्या खात्यात आता ३ अर्धशतके जमा झाली आहेत.
टी-२० आशिया कप स्पर्धेत सर्वाधिक वेळा ५० पेक्षा अधिक धावा करण्याचा विक्रम हा विराट कोहलीच्या नावे आहे. कोहलीनं आपल्या T20I कारकिर्दीत ४ वेळा ही कामगिरी करून दाखवली आहे.
श्रीलंकेचा सलामीवीर पथुम निसंकानं यंदाच्या हंगामातील तीन सामन्यात २ अर्धशतके झळकवताना विराट कोहलीच्याविक्रमाशी बरोबरी केलीये. आणखी एक अर्धशतक करताच तो विराट कोहलीला मागे टाकून त्याला या यादीत अव्वलस्थानी पोहचण्याची संधी आहे.