टीम इंडियाचा दोन वेळचा वर्ल्ड चॅम्पियन कुलदीप यादव आणि वंशिका यांच्या लग्नाची सध्या जोरदार चर्चा रंगताना दिसत आहे.
ब्रिटिश काळात मसूरी येथील ज्या सेवाय हॉटेलात भारतीयांना बंदी होती त्या महागड्या आणि अलिशान हॉटेलात क्रिकेटरचा विवाह सोहळा पार पडणार आहे.
इथं जाणून घेऊयात 'बचपन का प्यार...' म्हणत वंशिकासोबत नव्या आयुष्याची सुरुवात करण्यासाठी सज्ज असलेल्या कुलदीप यादवच्या कमाईची गोष्ट
कुलदीप यादव हा कोट्यवधीचा मालक आहे. त्याची एकूण संपत्ती जवळपास ३२-३५ कोटींच्या घरात आहे.
२०१२ च्या IPL मध्ये मुंबई इंडियन्सने त्याच्यासाठी १० लाख रुपये मोजले होते. यंदाच्या हंगामात दिल्ली कॅपिटल्सच्या संघाने १३.१५ कोटींसह त्याला रिटेन केले आहे. या लीगमधून त्याने कोट्यवधींची कमाई केली आहे.
क्रिकेटशिवाय कुलदीप यादव हा आदिदास, ऐस मनी ट्रान्सफर, ओपो यासारख्या ब्रँडच्या जाहिरातीतूनही तगडी कमाई करतो.
उत्तर प्रदेशमधील कानपूरमध्ये कुलदीप यादवचं अलिशान घर आहे. ज्याची किंमत ३ ते ५ कोटी रुपये इतकी असल्याचे बोलले जाते.
कुलदीप यादव हा कोट्यवधीच्या Mercedes-Benz GLE सह फोर्ड इकोस्पोर्ट्स (किंमत जवळपास १५ लाख) आणि ऑडी ए ६ (जवळपास ५५ लाख) यासारख्या महागड्या कारचा मालक आहे.