भारतीय खेळाडू सध्या IPL मध्ये आपली प्रतिभा दाखवत आहेत. IPL 2025 च्या हंगामात अनेक तरुण खेळाडूंनी आपली छाप सोडली आहे.
दुसरीकडे, टीम इंडियाचा एक खेळाडू असा आहे, जो यावेळी IPL चा भाग नाही. IPL Auction 2025 मध्ये त्याला कोणीही खरेदी केले नाही.
अशा परिस्थितीत या क्रिकेटपटूने एक मोठा निर्णय घेतला आणि त्याने थेट एका परदेशी संघाकडून खेळण्याचा निर्धार केला.
आता त्याने त्याच्या नवीन संघासाठी पदार्पण केले आहे आणि विशेष म्हणजे पहिल्याच सामन्यात शतक झळकावून त्याने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.
हा खेळाडू म्हणजे केएस भरत. तो यंदाच्या IPL मध्ये खेळत नाहीये. तो गेल्या वर्षभरापासून टीम इंडियासाठीदेखील एकही सामना खेळलेला नाही.
अशा परिस्थितीत, त्याने आपल्या कारकिर्दीला एक नवीन दिशा देण्याचा निर्णय घेतला आणि इंग्लंडच्या प्रतिष्ठित सरे चॅम्पियनशिपमध्ये नशीब आजमावले.
डलविच क्रिकेट क्लबकडून खेळताना त्याने पदार्पणाच्या सामन्यातच शानदार शतक झळकावले आणि त्याच्या संघाला विजय मिळवून दिला.
एशर क्रिकेट क्लब विरुद्ध खेळल्या सामन्यात केएस भरतने १०८ चेंडूत १३४ धावा कुटल्या. त्याच्या खेळीत १७ चौकार आणि ५ षटकारांचा समावेश होता.