कोलकाताच्या इडन गार्डन्सवर ऐतिहासिक सामन्याची जोरदार तयारी सुरु आहे.
मैदानामध्ये बऱ्याच नवीन गोष्टी यावेळी पाहायला मिळणार आहेत.
या सामन्यात गुलाबी रंगाचा चेंडू वापरण्यात येणार आहे. त्यामुळे मैदानात गुलाबी रंगाचे फुगे लावण्यात येणार आहेत.
मैदानाबाहेरही संपूर्ण कोलकात्यामध्ये सुंदर सजावट सुरु आहे.
कोलकात्याच्या भिंती क्रिकेटच्या वेगवेगळ्या रुपांनी रंगवल्या जात आहे.
यासाठी कोलकात्यातील कलाकारांनी कंबर कसली आहे.
त्यामुळे कोलकात्यामध्ये जे चाहते कोलकाताबाहेरून सामना पाहायला येतील, त्यांच्यासाठी ही पर्वणीच असेल.