माजी दिग्गज भारतीय क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरच्या कुटुंबात लवकरच लग्नाचे सनई चौघडे वाजणार आहेत. नुकताच अर्जुन तेंडुलकर आणि सानिया चांडोक यांचा साखरपुडा झाला आहे. १३ ऑगस्ट रोजी त्यांच्या साखरपुड्याची वृत्त आले. यानंतर दोघांचेही फोटो सोशल मीडियावर जबरदस्त व्हायरल होत आहेत.
यातच आता, सचिन तेंडुलकरची होणारी सून सानिया चांडोक नेमकी कोण आहे? ती आणि तिचे कुटुंब कोणत्या धर्माचे पालन करते? असे अनेक प्रश्न अनेकांच्या मनात आहेत. तर जाणून घेऊया...
कोण आहे सानिया चांडोक - सानिया चांडोक ही देशातील प्रसिद्ध उद्योगपती रवी घई यांची नात आहे. तिचे आजोबा रवि घई, हे पंचतारांकित इंटरकॉन्टिनेंटल हॉटेलचे मालक आहेत. ते ब्रुकलिन क्रीमरीसारख्या व्यवसायात सक्रिय आहेत. जे आरोग्यासाठी अनुकूल आइस्क्रीम आणि फ्रोझन स्वीट्स तयार करतात.
सानियाने लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समधून पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले आहे. सानियाचा स्वतःचा खास व्यवसायही आहे. ती मुंबईमध्ये प्रीमियम पेट सलून, स्पा आणि स्टोअर चालवते.
'मिस्टर पॉज' असे त्याचे नाव आहे. मिस्टर पॉज हे पेट स्पा, सलून आणि स्टोअर मुंबईतील उच्च्रभू अशा वरळी परिसरात आहे. महत्वाचे म्हणजे, सानिया चांडोक ही स्वत: व्हेटेरनरी टेक्निशिअनही आहे. तिने WVSचा ABC प्रोग्रामही पूर्ण केला आहे.
कोणत्या धर्माचं पालन करतं सानियाचं कुटुंब - सानिया चांडोक हिच्या धर्मासंदर्भात बोलायचे झाल्यास, उपलब्ध माहितीनुसार, चांडोक हे एक पंजाबी आडनाव आहे. चंडोक आडनाव असलेले लोक साधारणपणे शीख धर्माचे पालन करतात. तथापी, काही चांडोक आडनाव असलेले लोक हिंदू आणि शीख अशा दोन्ही धर्माचे पालन करतात. दोन्ही धर्म मानतात.
सानिया चांडोकसंदर्भात बोलायचे झाल्यास, तिचे कुटुंब हिंदू धर्माचे पालन करते. सानिया ज्या घई कुटुंबातून येते, ते एक पारंपारिक हिंदू व्यावसायिक कुटुंब आहे.
सानिया चांडोल ही, अर्जुन तेंडुलकरची सख्खी बहिण असलेल्या सारा तेंडुलकर हिच्यासोबत बरेच वेळा दिसली आहे. त्या दोघी चांगल्या मैत्रिणी आहेत. त्यांचे एकत्र फोटोही आहेत.