संजय बांगर यांची उचलबांगडी भारताच्या निवड समितीने राठोड यांच्यावर फलंदाजी प्रशिक्षकपदाची जबाबदारी सोपवली.
राठोड यांनी 1996 साली इंग्लंडमध्ये भारताकडून पदार्पण केले होते.
भारतीय संघाकडून त्यांनी सहा कसोटी आणि सात एकदिवसीय सामने खेळले आहेत.
काही दिवसांपूर्वी भारताचा माजी महान फलंदाज राहुल द्रविडने राठोड यांना भारताच्या 'अ' संघाचे फलंदाजी प्रशिक्षक बनवायला हवे, असे मत व्यक्त केले होते.
राठोड हे 2012 साली भारताच्या निवड समितीचे सदस्य होते.