Year Ender 2023 : यंदाच्या वर्षात ११ क्रिकेटपटू अडकले विवाहबंधनात; ७ भारतीय शिलेदारांचा समावेश

11 Cricketer Married In 2023 : २०२३ या वर्षात जगभरातील अकरा क्रिकेटपटू विवाहबंधनात अडकले.

भारतीय संघाचा स्टार यष्टीरक्षक खेळाडू लोकेश राहुलने या वर्षाच्या पहिल्या महिन्यात अथिया शेट्टीसोबत सातफेरे घेतले. अथिया ही बॉलिवूड अभिनेते सुनील शेट्टी यांची मुलगी आहे.

मराठमोळा क्रिकेटपटू शार्दुल ठाकूरने देखील यंदा नवीन इनिंग सुरू केली. त्याने जानेवारी २०२३ मध्ये मिताली पारूलकरसोबत विवाहगाठ बांधली. लग्नाच्या दोन वर्षांपूर्वी त्याचा साखरपुडा झाला होता.

अष्टपैलू अक्षर पटेलने देखील जानेवारीमध्ये लग्न केले. त्याने प्रेयसी मेहा पटेलसोबत सातफेरे घेतले.

वेगवान गोलंदाज मुकेश कुमार अलीकडेच विवाहबंधनात अडकला. त्याने ऑस्ट्रेलियाविरूद्धच्या मालिकेदरम्यान लग्नासाठी सुट्टी घेतली होती. मुकेशने २८ नोव्हेंबर रोजी लग्न केले. त्याने त्याची मैत्रिण दिव्या सिंहसोबत याच वर्षी फेब्रुवारीत साखरपुडा केला होता.

भारताचा सलामीवीर ऋतुराज गायकवाडने या वर्षीच्या जूनमध्ये लग्न केले. ऋतुराजने उत्कर्षा पवारसोबत विवाहगाठ बांधली, जी देखील एक क्रिकेटर असून देशांतर्गत क्रिकेटमध्ये महाराष्ट्राच्या संघाकडून खेळते.

पाकिस्तानचा सलामीवीर इमाम-उल-हकने त्याची मैत्रीण अनमोल महमूदसोबत नोव्हेंबरमध्ये लग्न केले.

पाकिस्तानी संघाचा अष्टपैलू खेळाडू शादाब खान देखील या वर्षी विवाहबंधनात अडकला. त्याने सकलैन मुश्ताकच्या मुलीसोबत सातफेरे घेतले.

दक्षिण आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज गेराल्ड कोएत्झीने अलीकडेच लग्न केले. वर्ल्ड कपच्या या पर्वात सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्या गोलंदाजांमध्ये अव्वल पाच खेळाडूंमध्ये तो होता. गेराल्डने आपल्या लग्नाचे फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत.

भारताचा वेगवान गोलंदाज प्रसिद्ध कृष्णाने जून २०२३ मध्ये लग्न केले. दोन दिवसांपूर्वी अर्थात ६ जून रोजी साखरपुडा झाल्यानंतर आठ तारखेला भारतीय खेळाडूने सातफेरे घेतले.

भारताचा आणखी एक वेगवान गोलंदाज नवदीप सैनीनेही याच वर्षी लग्न केले. नवदीपचा नोव्हेंबर महिन्यात विवाहसोहळा पार पाडला. त्याने त्याची मैत्रीण स्वाती अस्थाना हिच्याशी लग्न केले.

पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज शाहीन आफ्रिदीने या वर्षी फेब्रुवारीमध्ये लग्न केले. त्याने पाकिस्तानचा माजी खेळाडू शाहिद आफ्रिदीची मुलगी अंशासोबत सातफेरे घेतले.