भारतीय संघाचा खेळाडू लोकेश राहुल आणि अथिया शेट्टी विवाहबंधात अडकले आहेत. 23 जानेवारीला दोघांचे लग्न झाले. लग्नात पाहुण्यांचा ओघ तर होताच, पण लग्न झाल्यानंतरही या जोडप्याला कोट्यवधी रूपयांच्या भेटवस्तू मिळत आहेत.
क्रिकेटमध्ये व्यस्त असल्यामुळे भारतीय संघाचे सहकारी खेळाडू लोकेश राहुलच्या लग्नाला पोहोचू शकले नाहीत. पण नवदाम्पत्याला विराट कोहलीने कोट्यवधी रूपयांची भेटवस्तू दिली आहे.
खरं तर विराट कोहलीसह भारतीय संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीने देखील राहुलला लग्नाची अनोखी भेट दिली आहे.
विराट-धोनीने राहुलला काय गिफ्ट दिले आहे याची जोरदार चर्चा रंगली आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, धोनी आणि विराटने लोकेश राहुल आणि त्याची पत्नी अथिया शेट्टी यांना त्यांच्या आवडीच्या वस्तू भेट म्हणून दिल्या आहेत.
माहितीनुसार, विराट कोहलीने राहुल आणि अथियाला प्रसिद्ध बीएमडब्ल्यू कार भेट दिली आहे. लक्षणीय बाब म्हणजे या कारची किंमत सुमारे 2.17 कोटी रुपये आहे.
महेंद्रसिंग धोनीने लोकेश राहुल आणि अथिया शेट्टी या जोडप्याला भेटवस्तू म्हणून आपल्या 'काळजाचा तुकडा' असलेली बाईक दिली आहे. म्हणजेच धोनीने त्याची सर्वात आवडती वस्तू गिफ्ट म्हणून दिली आहे.
धोनी बाईक्सचा खूप शौकीन आहे. त्यामुळे त्याने राहुलला कावासाकी निन्जा बाईक भेट म्हणून दिली. बाजारमूल्यानुसार या बाईकची किंमत सुमारे 80 लाख रुपयांच्या घरात आहे.