कोलकाता नाईट रायडर्सने सोमवारी मुंबई इंडियन्सवर ५२ धावांनी विजय मिळवून आयपीएल २०२२च्या प्ले ऑफ लढतीतील स्वतःचे आव्हान कायम राखले. कोलकाताच्या ९ बाद १६५ धावांचा पाठलाग करताना मुंबईचा संपूर्ण संघ ११३ धावांवर माघारी परतला.
जसप्रीत बुमराहने १० धावांत ५ विकेट्स घेत कोलकाताला धक्के दिले. पण, वेंकटेश अय्यर ( ४३), नितिश राणा ( ४३), अजिंक्य रहाणे ( २५) व रिंकू सिंग ( २३*) यांनी KKRला समाधानकारक पल्ला गाठून दिला.
रोहित शर्माला चुकीच्या निर्णयाचा फटका बसल्यानंतर मुंबईचा डाव गडगडला. इशान किशन ( ५१) याने एकट्याने खिंड लढवली. पण, पॅट कमिन्सने तीन व आंद्रे रसेलने २ विकेट्स घेत MI चा पराभव पक्का केला.
कोलकातासाठी करो वा मरो अशा या लढतीत एक तरुणी लकी गर्ल ठरली. साची मारवाह ( Saachi Marwah) असं या तरुणीचं नाव आहे आणि सोशल तिचे फोटो व्हायरल झाले आहेत. ७ डिसेंबर १९९१ सालचा तिचा जन्म आणि ती मुळची दिल्लीची आहे.
नवी दिल्ली येथील एअर फोर्स बाल भारती शाळेत तिने प्राथमिक शिक्षण घेतले आणि त्यानंतर गुरुग्राम येथील Sushant School of Art and Architecture येथून इंटेरियन डिझायनरचा कोर्स पूर्ण केला.
तिला interior designer क्षेत्रात पुरस्कारही मिळाले आहेत आणि तिची आई संगिता या लाकडापासून मुर्ती बनवतात व त्यासाठी त्यांना राष्ट्रीय स्पर्धेत कांस्यपदकही मिळाले आहे.
२०१६मध्ये सांचीने नवनीत कौर सोबत Saachi and Navneet Design Studio ही कंपनी सुरू केली. सोशल मीडियावर ती फार अॅक्टिव्ह असते.
सांची ही KKRचा फलंदाज नितीश राणा याची पत्नी आहे. २०१६ मध्ये सांची व नितिश यांची भेट झाली.
सांचीचा भाऊ परम हा फुटबॉलपटू आहे आणि तो नितिशचा मित्र आहे. सांची भावाला चिअर करण्यासाठी फुटबॉल स्टेडियमवर यायची आणि तिथेच नितिशसोबत तिची भेट झाली.
२०१८मध्ये या दोघांनी साखरपुडा केला आणि १८ फेब्रुवारी २०१९मध्ये लग्न केले.