कॅरेबियन पॉवर हिटर केरॉन पोलार्ड याने मैदानातील आपल्या फटकेबाजीनं कमालीचा चाहता वर्ग कमावलाय. देशाचे प्रतिनीधीत्व करताना चमकण्यापेक्षा IPL मध्ये मुंबई इंडियन्सकडून त्याने आपली खास छाप सोडलीये. आता तो मैदानाबाहेरील रोमँण्टिक अंदाजामुळे चर्चेत आलाय.
खेळाडूच्या रुपात IPL मधून तो निवृत्त झाला असला तरी सपोर्ट स्टाफच्या रुपात तो आजही मुंबई इंडियन्सशी कनेक्ट आहे. त्यामुळे कॅरेबियनचा हा खेळाडू म्हणजे मुंबई इंडियन्ससाठी जन्माला आलेला क्रिकेटर असंही म्हटलं जाते.
क्रिकेटच्या मैदानातील स्फोटक फटकेबाजीशिवाय फिल्डबाहेरील प्रेमाच्या खेळामुळेही तो चर्चेत राहिलाय. आता त्याने तेरा मेरा सात ... अशा तोऱ्यात खास फोटो शेअर करत पत्नी जेनावर प्रेमाची 'बरसात' केलीये.
अगदी फोटोत दिसते तशी या जोडीची लव्ह स्टोरी एकदम झक्कास आणि रोमँटिक आहे.
यात पोलार्डच्या कडक लूकसह रेड आउटफिट्समध्ये त्याच्या पत्नीचा अंदाज लक्षवेधून घेणारा आहे.
सात वर्षांच्या डेटिंगनंतर दोघांनी २५ ऑगस्ट २०१२ रोजी लग्न उरकलं होतं. लग्नाच्या १३ व्या वाढदिवसाच्या निमित्ताने पोलार्डनं पत्नी जेनासोबतचे खास फोटो शेअर केले आहेत.
मुंबई इंडियन्स फ्रँचायझी संघानेही या दोघांना लग्नाच्या शुभेच्छा देण्यासाठी खास पोस्ट शेअर केल्याचे पाहायला मिळाले.
वेस्ट इंडिज आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील सामना पाहण्यासाठी आल्यावर जेना पहिल्यांदा पोलार्डला भेटली. दोघांच्या भेटी गाठीचा सिलसिला वाढला. लग्नाआधी आई बाबा झाल्यावर या दोघांनी लग्नाचा निर्णय घेतला होता.
आकाश अंबानी आणि राधिका मर्चंट याच्या शाही लग्न सोहळ्याच्या कार्यक्रमातील या जोडीचा स्टायलिश अंदाजात चर्चेचा विषय ठरली होता.