Kieron Pollard Angry, Mumbai Indians: भारतात क्रिकेट हा प्रचंड लोकप्रिय खेळ आहे. भारतातील चाहते टीम इंडियाच्याच खेळाडूंना पसंती दर्शवतातच. पण त्यासोबत परदेशी खेळाडूंवर तितकंच प्रेम करतात. वेस्ट इंडिजचा माजी कर्णधार किरॉन पोलार्ड याचा भारतात मोठ्या प्रमाणावर चाहतावर्ग आहे.
पोलार्ड IPL मध्ये मुंबई इंडियन्स संघासाठी सुमारे १०-१२ वर्षे खेळतोय. त्यामुळे त्याच्या भारतात भरपूर लोकप्रियता मिळाली. पण नुकत्याच संपलेल्या IPLच्या हंगामात पोलार्डला फारशी कमाल दाखवता आली नाही. शेवटच्या काही सामन्यात तर त्याला संघातून बाहेरही बसवण्यात आले.
याच दरम्यान पोलार्डवर एका माजी क्रिकेटपटूने टीका केली होती. त्या टीकेला पोलार्डने सणसणीत प्रत्युत्तर दिले.
भारताचा माजी क्रिकेटपटू आणि समालोचक आकाश चोप्रा याने पोलार्डवर खरपूस शब्दात टीका केली होती. 'मला असं वाटतं की आपण यंदा पोलार्डला IPL मध्ये अखेरचा हंगाम खेळताना पाहतोय. मुंबईने पोलार्ड ला पुढील वर्षी कारारमुक्त केलं पाहिजे. त्याचे 6 कोटी दुसरीकडे वापरता येऊ शकतील. आता मुंबईने पोलार्डला संघाबाहेर बसवून डेवाल्ड ब्रेविस (बेबी एबी) ला संधी दिली पाहीजे.'
'पोलार्डला सतत किती संधी घ्यायच्या यालाही मर्यादा आहेत. तो धावा करत नाहीये ही वस्तुस्थिती आहे. तो गोलंदाजी चांगली करतो पण याचा अर्थ असा नाही की त्याला गोलंदाज म्हणून संघात घेता येईल. त्यामुळे आता पोलार्ड ला टाटा बाय बाय करण्याची वेळ आली आहे असं मला वाटतं', असं आकाश चोप्रा म्हणाला होता.
'आकाश चोप्रा, मला अशी आशा आहे की (माझ्यावर टीका केल्याने) तुझ्या चाहत्यांच्या संख्येत आणि फॉलोअर्सच्या संख्येत भरपूर वाढ झाली असेल. तू जे काही करतो आहेस ते असंच सुरू ठेव', असं ट्वीट पोलार्डने केले आणि आकाश चोप्राचा समाचार घेतला. मात्र महत्त्वाची बाब म्हणजे, काही वेळातच त्याने ते ट्वीट केलं.