बॉलिवूड आणि टेलिव्हिजन क्षेत्रातील बोल्ड ब्युटी खुशी मुखर्जी हिने भारतीय टी-२० संघाचा कर्णधार सूर्यकुमार यादवसंदर्भात भुवया उंचावणारे वक्तव्य केले होते.
सूर्यकुमार यादव मला सारखे सारखे मेसेज पाठवायचा, असे खुशी मुखर्जी म्हणाली होती. अभिनेत्रीचे हे वक्तव्य चांगलेच चर्चेत आले. ती प्रसिद्धीसाठी स्टार क्रिकेटरचं नाव घेत आहे,अशी चर्चाही सोशल मीडियावर रंगली.
सूर्यासोबत नाव जोडण्याचा खेळलेला डाव तिच्या चांगलाच अंगलट आला. तिच्या जुन्या वादग्रस्त गोष्टी पुन्हा चव्हाट्यावर आणत नेटकऱ्यांनी तिला ट्रोल करण्यास सुरुवात केली. त्यानंतर आता या अभिनेत्रीने सूर बदलले आहेत. सूर्यासंदर्भात तिने केलेल्या दाव्यासंदर्भात ज्या चर्चा रंगत आहेत त्यावर तिने स्पष्टीकरण दिले आहे.
या अभिनेत्रीने NDTV ला टेलिफोनच्या माध्यमातून दिलेल्या मुलाखतीत क्रिकेटर सूर्यकुमार यादवसोबत रोमँटिंक नातं वैगरे अजिबात नव्हते, असे स्पष्टपणे सांगितले आहे.
आम्ही मित्र म्हणून एकमेकांसोबत बोलू शकत नाही का? असा प्रश्न उपस्थितीत करत ती म्हणाली की, आमच्यात मैत्रीपलिकडे काहीचं नव्हते.
माझं इन्स्टाग्राम अकाउंट हॅक झालं होते, काही गोष्टी चुकीच्या पद्धतीने समोर आणल्या जात आहेत. आम्ही कधीकाळी एकमेकांसोबत बोलायचो, पण आता आम्ही संपर्कात नाही, असेही ती म्हणाली आहे.
याआधी खुशी मुखर्जी ही अभिनयापेक्षा अजब गजब फॅशनेबल अंदाजामुळे चर्चेत राहिली आहे. तोकड्या कपड्यांतील बोल्ड अवतारामुळे तिला अनेकदा ट्रोलचा सामना करावा लागला आहे.
अनेकदा ट्रोल होऊनही तिने बोल्ड लूकमधील फोटोच्या जोरावर इन्स्टाग्रामवर १.५ मिलियन फॉलोअर्स कमावला आहे. हा आकडा वाढवण्यासाठी तिने सूर्याचं नाव घेतलं होत का? हा एक मोठा प्रश्नच आहे. पण तुर्तास तरी तिने या चर्चेला ब्रेक लावला आहे.