Join us  

Kapil Dev Reaction on Arjun Tendulkar: "आता अर्जुन तेंडुलकरची चर्चा बास करा आणि..."; कपिल देव यांनी केलं मोठं विधान

By ऑनलाइन लोकमत | Published: June 04, 2022 5:50 PM

Open in App
1 / 6

Kapil Dev Reaction on Arjun Tendulkar: नुकत्याच पार पडलेल्या IPL 2022 स्पर्धेत गुजरात टायटन्सने विजेतेपद जिंकले. पहिल्याच प्रयत्नात ट्रॉफी जिंकल्यामुळे कर्णधार हार्दिक पांड्याचे खूप कौतुक झाले. पण त्याशिवाय या हंगामात आणखी एका नावाची चर्चा रंगली ते नाव म्हणजे दिग्गज क्रिकेटर सचिन तेंडुलकरचा (Sachin Tendulkar) मुलगा अर्जुन तेंडुलकर.

2 / 6

अर्जुन तेंडुलकर मुंबई इंडियन्सतर्फे आपला दुसरा सीझन खेळला. पण त्याला दोन हंगामात मिळून एकही सामना खेळण्याची संधी देण्यात आली नाही. वेळप्रसंगी नवे खेळाडू संघात सामील करुन त्यांना खेळवले पण अर्जुन मात्र संधीपासून वंचित राहिला.

3 / 6

अर्जुनबाबत मुंबईची अशी वागणूक चाहत्यांना अजिबात रुचली नाही. चाहत्यांनी मुंबई इंडियन्सच्या व्यवस्थापनाला आणि रोहित शर्माला नावं ठेवली. आता या बहुचर्चित अर्जुन तेंडुलकरबद्दल विश्वविजेता कर्णधार कपिल देव यांनी आपलं रोखठोक मत मांडलं आहे.

4 / 6

कपिल देव म्हणाले, 'अर्जुन तेंडुलकरबद्दल सगळे जण इतकी चर्चा कशासाठी करता? तो सचिन तेंडुलकरचा मुलगा आहे म्हणून ही चर्चा सुरू आहे. पण त्याला त्याचं क्रिकेट खेळू द्या. त्याची सचिनसोबत तुलना करणं थांबवा.'

5 / 6

'सचिनचा मुलगा असणं हे त्याच्यासाठी फायद्याचं असलं तरी तितकंच तोट्याचंही आहे. सर डॉन ब्रॅडमन यांच्या मुलाने अडनावाचा दबाव झेपला नसल्याने अडनाव बदलून घेतलं होतं. तुम्हीही अर्जुनवर दबाव टाकू नका. तो अजून युवा खेळाडू आहे.'

6 / 6

'अर्जुनचे वडिल दिग्गज क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर आहेत. असं असताना त्याला उपदेश करणारे आपण कोण? तेंडुलकर असं नाव ऐकलं की आपल्या अपेक्षा उंचावतात. पण असं असलं तरी मी अर्जुनला असं सांगेन की त्याने त्याच्या वडिलांच्या कर्तृत्वाच्या ५० टक्के जरी कर्तृत्व गाजवलं तर त्यापेक्षा छान इतर काहीही नसेल', अशा शब्दात कपिल देव यांनी चाहत्यांना समजवण्याचा प्रयत्न केला.

टॅग्स :अर्जुन तेंडुलकरकपिल देवसचिन तेंडुलकरमुंबई इंडियन्सआयपीएल २०२२
Open in App