टीम इंडियाचा मुख्य जलदगती गोलंदाज इशांत शर्मा याची पत्नी प्रतिमा सिंहने सोशल मीडियावरून काँग्रेसच्या महिला नेत्याचे वाभाडे काढले.
अलका लांबा असे या महिला नेत्याचे नाव आहे आणि तिनं खालच्या पातळीवर ऑलिम्पिक पदक विजेता कुस्तीपटू योगेश्वर दत्त याच्यावर टीका केली होती.
तिच्या या अपमानजनक पोस्टचा नेटिझन्स आणि अन्य क्रीडापटूंनी चांगलाच समाचार घेतला. त्यात इशांतची पत्नी आणि बास्केटबॉलपटू प्रतिमा हिनंही उडी घेतली.
प्रतिमानं ट्विटरवर पोस्ट लिहून अलका लांबाला उद्धट असल्याचे सांगितले आणि तुझ्या या वागण्यानं महिला बदनाम होत असल्याचा ओरापही प्रतिमानं केला.
तिनं लिहीलं की,''तुमचे विचार तुमची ओळख करून देत आहेत. ओळख अशी की.. तुम्ही खुपच उद्धट महिला आहात आणि तुमच्या वागण्यानं महिलांना बदनाम केलं आहेत. योगेश्वर दत्त यांच्या विरोधात बोलण्यापूर्वी एक जाणून घ्या की ते भारताची शान आहेत. भारतीय त्याचा अपमान सहन करू शकत नाही. त्याची माफी मागा.''
ही पोस्ट टाकून प्रतिमानं अलका लांबाला ब्लॉक केलं. प्रतिमानं भारतीय बास्केटबॉल संघाचे प्रतिनिधित्व केलं आहे.
काँग्रेस नेता अलका लांबानं 5 एप्रिलला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटो ट्विट करून त्यावर आक्षेपार्ह टिप्पणी केली होती.
त्या फोटोत मोदींनी संघचा पोषाख घातला आहे. त्यानंतर अलका लांबानं संघ आणि भाजपा विरोधात अपशब्द वापरले.
तिच्या या कृतीवर योगेश्वरनं सडकून टीका केली.
त्यानंतर लांबा भडकली आणि तिनं योगेश्वरवर आक्षेपार्ह पोस्ट लिहीली.