Join us

ब्लर फोटोबद्दल इरफान पठाणच्या बायकोनं अखेर मौन सोडलं; ट्रोल करणाऱ्यांना दिलं प्रत्युत्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 30, 2021 16:43 IST

Open in App
1 / 5

भारतीय संघाचा माजी अष्टपैलू खेळाडू इरफान पठाण (Irfan Pathan Wife Blur Photo) याने त्याची पत्नी सफा बेग हिचा चेहरा ब्लर करून सोशल मीडियावर एक फोटो पोस्ट केला आणि त्यानंतर यावरुन वाद झाला होता.

2 / 5

फोटोमध्ये इरफानसोबत त्याची पत्नी आणि मुलगा दिसत असून तिघेही मैदानामध्ये उभे असल्याचे दिसत होते. मात्र या फोटोमध्ये इरफानची पत्नी सफाचा चेहरा ब्लर करुन लपवण्यात आलाय. यावरुन अनेकांनी इरफानवर आणि त्याच्या विचारसरणीवर टीका केली. यावर इरफानने आपले उत्तर दिले होते. आता त्याच्या पत्नीनेही इरफानची पाठराखण करत आपली प्रतिक्रिया दिली आहे.

3 / 5

टाइम्स ऑफ इंडियाशी बोलताना सफा म्हणाली, मी माझा मुलगा इम्रानसाठी इन्स्टाग्रामवर एक अकाउंट तयार केले होते आणि मी तिथे पोस्ट करते, जेणेकरून तो मोठा झाल्यावर त्याच्यासाठी काही सुंदर आठवणी राहतील. मी हे अकाउंट हाताळते आणि विशेषत: त्या फोटोसाठी, मी माझ्या आवडीने माझा चेहरा ब्लर केला होता. हा पूर्णपणे माझा निर्णय होता आणि इरफानचा याच्याशी काही संबंध नाही, असं सफा बेगने म्हटलं आहे.

4 / 5

इरफानने यासंदर्भात ट्विटवरुन स्पष्टीकरण देत टीकाकारांना त्यांच्याच खोचक भाषेत सुनावले होते. हा फोटो माझ्या क्वीनने (पत्नी) माझ्या मुलाच्या अकाउंटवरुन स्वत: पोस्ट केला. या फोटोवरुन आम्हाला अनेकांनी वाईट शब्दांमध्ये प्रतिक्रिया दिल्यात. त्यामुळेच मी हा फोटो इथेही पोस्ट करत आहे.

5 / 5

माझ्या पत्नीने तिच्या इच्छेनुसारच या फोटोत स्वत:चा चेहरा ब्लर केला. आणि हो मी तिचा मालक नाहीय जोडीदार आहे, अशा कॅप्शनसहीत इरफानने त्याच्या कुटुंबाचा व्हायरल फोटो आपल्या अकाउंटवरुन पोस्ट केला होता. त्याने हर लाइफ हर चॉइस म्हणजेच तिचे आयुष्य तिची निवड असा हॅशटॅगही या ट्विटमध्ये वापरला होता.

टॅग्स :इरफान पठाणसोशल मीडिया