IPL2022 schedule: इंडियन प्रीमिअर लीगच्या १५व्या पर्वाची (Indian Premier League 2022) तारीख अखेर ठरली. आयपीएल गव्हर्निंग काऊंसिलच्या गुरुवारी झालेल्या बैठकीत ही तारीख ठरवण्यात आली. आयपीएल २६ मार्चला सुरू होणार असल्याचे चेअरमन ब्रिजेश पटेल यांनी जाहीर केले. २९ मे ला अंतिम सामना होणार आहे. तुर्तास तरी साखळी फेरीचे सर्व सामने महाराष्ट्रात खेळवण्यात येणार आहेत.
आयपीएल २०२२चे साखळी फेरीतील ५५ सामने मुंबईत, तर १५ सामने पुण्यात खेळवण्यात येणार आहेत. ५५ सामने वानखेडे स्टेडियम, ब्रेबॉर्न स्टेडियम आणि डी वाय पाटील स्टेडियम येथे खेळवण्यात येतील, तर पुण्याच्या स्टेडियमवर १५ सामने होणार आहेत. २६ मार्च ते २९ मे या कालावधीत आयपीएल २०२२ खेळवण्यात येणार आहे.
लखनौ व अहमदाबाद या दोन नव्या फ्रँचायझी दाखल झाल्यामुळे १० संघांमध्ये यंदाची आयपीएल होणार आहे. १० संघांची प्रत्येकी पाच अशा दोन गटांत विभागणी करण्यात आली आहे.
मुंबईच्या वानखेडे स्टेडियम व डी वाय पाटील स्टेडियमवर प्रत्येकी २०, तर ब्रेबॉर्न स्टेडियम व पुण्यातील गहुंजे स्टेडियमवर प्रत्येकी १५ सामने खेळवण्यात येतील.
१० संघा साखळी फेरीत प्रत्येकी १४ सामने खेळतील. त्यापैकी ७ होम व ७ अवे असा फॉरमॅट असेल. साखळी फेरीत एकूण ७० सामने होतील आणि त्यानंतर ४ प्ले ऑफचे सामने. प्रत्येक संघ एकमेकांशी दोन आणि चार संघांशी प्रत्येकी एक असे सामने खेळतील.
ग्रुप अ - मुंबई इंडियन्स, कोलकाता नाइट रायडर्स, राजस्थान रॉयल्स, दिल्ली कॅपिटल्स, लखनौ सुपर जायंट्स
ग्रुप ब - चेन्नई सुपर किंग्स, सनरायझर्स हैदराबाद, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू, पंजाब किंग्स, गुजरात टायटन्स
मुंबई इंडियन्सचा संघ कोलकाता, राजस्थान, दिल्ली, लखनौ व चेन्नई यांच्याशी दोनवेळा भिडणार, तर हैदराबाद, बंगळुरू, पंजाब व गुजरात यांच्याविरुद्ध एकच सामना खेळणार
चेन्नई सुपर किंग्सचा संघ हैदराबाद, बंगळुरू, पंजाब, गुजरात व मुंबई यांच्याशी प्रत्येकी दोन, तर कोलकाता, राजस्थान, दिल्ली व लखनौ यांच्याशी प्रत्येकी एक सामना खेळणार
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा संघ चेन्नई, हैदराबाद, पंजाब, गुजरात व राजस्थान यांच्याशी प्रत्येकी दोन, तर मुंबई, कोलकाता, दिल्ली व लखनौ यांच्यासोबत प्रत्येकी १ सामना खेळणार.
कोलकाता नाइट रायडर्सचा संघ मुंबई, राजस्थान, दिल्ली, लखनौ व हैदराबाद यांच्याशी प्रत्येकी दोन, तर चेन्नई, बंगळुरु, पंजाब व गुजरात यांच्याशी प्रत्येकी एक सामना खेळणार.