IPL vs PSL Salaries difference : पाकिस्तान क्रिकेट मंडळाचे ( PCB) अध्यक्ष रमीझ राजा ( Ramiz Raja) हे इंडियन प्रीमिअर लीगशी ( Indian Premier League) स्पर्धा करायला निघाले आहेत. पाकिस्तान सुपर लीगमध्ये ( Pakistan Super League) ऑक्शन पद्धत आणून ते IPLला चॅलेंज देण्याचे स्वप्न पाहत आहेत.
कालच त्यांनी एक मोठं विधान केलं. ते म्हणाले,''हा पैशांचा खेळ आहे. पाकिस्तानची क्रिकेट अर्थव्यवस्था वाढली, तर आमचा आदरही वाढेल. सध्यातरी त्यासाठी PSLहाच एक सोर्स आमच्याकडे आहे. जर आम्ही PSLमध्ये ऑक्शन सुरू केले आणि फ्रँचायझींच्या पर्स मर्यादा वाढवली, तर आम्ही IPLला टक्कर देऊ शकतो. मग बघतो की PSL सोडून कोण IPL खेळायला जातं.''
पाकिस्तान सुपर लीगमध्ये खेळाडूंसाठी ड्राफ्ट तयार केले जाते आणि त्यात स्थानिक खेळाडूंसह परदेशी खेळाडूंचाही समावेश असतो आणि विविध फ्रँचायझी खेळाडूंची निवड करते. या ड्राफ्टनुसार खेळाडूंची पाच गटांत विभागणी केलेली आहे. त्यानुसारच खेळाडूंना पाच प्रकारचे करार दिले जातात.
प्लॅटिनम कॅटेगरी - या कॅटेगरीत असेलल्या खेळाडूला प्रती पर्व २,३०,४४,००० ( पाकिस्तानी रुपया) इतकी रक्कम दिली जाते. यात बाबर आजम, मोहम्मद रिझवान, कॉलिन मुन्रो, जेसन रॉय, राशिद खान, शाहीन आफ्रिदी, वहाब रियाझ, लाएम लिव्हिंगस्टोन, फखर जमा या खेळाडूंचा समावेश आहे.
डायमंड कॅटेगरी - या कॅटेगरीतील खेळाडूला १ कोटी १५ लाख २२ हजार ( पाकिस्तीन रुपया) पगार दिला जातो. यात शादाब खान, फहीम अशरफ, मोहम्मद आमिर, मोहम्मद नबी, हॅरिस रौफ, मोहम्मद हाफिज, इम्रान ताहिर, हैदर अली, शोएब मलिक आदी खेळाडूंचा समावेश आहे
गोल्ड कॅटेगरी - या कॅटेगरीतील खेळाडूला ८२. ३० लाख ( पाकिस्तानी रुपया) दिले जातात. यात मोहम्मद हसनैन, साकिब महमूद , खुशदिल शाह, शाहनवाज दहानी, जो क्लार्क, शर्जील खान, फिल सॉल्ट, उस्मान कादिर यांचा समावेश आहे
सिल्वहर कॅटेगरी - यात खेळाडूला ४१.१५ लाख ( पाकिस्तानी रुपया) दिले जातात. कामरान अकमल, अन्वर अली, सोहेल तन्वीर, बेन डकेट, उमर अकमल, पॉल स्टर्लिंग या खेळाडूंचा समावेश आहे.
इमर्जिंग कॅटेगरी - १६.४६ लाख ( पाकिस्तानी रुपया)
IPL vs ISL - आयपीएल २०२२ लोकेश राहुल हा सर्वाधिक १७ कोटी पगार घेणारा खेळाडू आहे. PSL मध्ये सर्वाधिक पगार २ कोटी ३० लाख ( पाकिस्तानी रुपया) इतका मिळतो. आता यावरूनच फरक स्पष्ट होतो. भारताचा १ रुपया हा पाकिस्तनच्या २.३५ रुपयांसमान आहे.