आगामी हंगामासाठी आज अनेक बड्या खेळांडूंसह एकूण ५००हून अधिक खेळाडूंचा लिलाव होणार आहे. यासाठी सर्व संघांना मोठी रक्कम वाचवून ठेवली आहे. पाहूया, लिलावात उतरताना कोणत्या संघाकडे किती पैसे शिल्लक आहेत…
चेन्नई सुपर किंग्ज संघाने ५ खेळाडू रिटेन केलेत. त्यामुळे त्यांना आता एकूण २० खेळाडू खरेदी करता येतील. त्यात जास्तीत जास्त ७ परदेशी खेळाडूंचा समावेश करता येईल. यासाठी त्यांच्याकडे ६५ कोटी रुपये शिल्लक आहेत.
दिल्ली कॅपिटल्स संघाने ४७ कोटी खर्च करून ४ खेळाडू रिटेन केलेत. त्यामुळे त्यांना आता एकूण २१ खेळाडू खरेदी करता येतील. त्यात जास्तीत जास्त ७ परदेशी खेळाडूंचा समावेश करता येईल. यासाठी त्यांच्याकडे ७३ कोटी रुपये शिल्लक आहेत.
गुजरात टायटन्स संघाने ५१ कोटी रुपये खर्च करून ५ खेळाडू रिटेन केलेत. त्यामुळे त्यांना आता एकूण २० खेळाडू खरेदी करता येतील. त्यात जास्तीत जास्त ७ परदेशी खेळाडूंचा समावेश करता येईल. यासाठी त्यांच्याकडे ६९ कोटी रुपये शिल्लक आहेत.
कोलकाता नाइट रायडर्स संघाने ६९ कोटी रुपये खर्चून ६ खेळाडू रिटेन केलेत. त्यामुळे त्यांना आता एकूण १९ खेळाडू खरेदी करता येतील. त्यात जास्तीत जास्त ६ परदेशी खेळाडूंचा समावेश करता येईल. यासाठी त्यांच्याकडे ५१ कोटी रुपये शिल्लक आहेत.
लखनौ सुपर जायंट्स संघाने ५१ कोटी खर्च करून ५ खेळाडू रिटेन केलेत. त्यामुळे त्यांना आता एकूण २० खेळाडू खरेदी करता येतील. त्यात जास्तीत जास्त ७ परदेशी खेळाडूंचा समावेश करता येईल. यासाठी त्यांच्याकडे ६९ कोटी रुपये शिल्लक आहेत.
मुंबई इंडियन्स संघाने ७५ कोटी रुपये खर्च करत ५ खेळाडू रिटेन केलेत. त्यामुळे त्यांना आता एकूण २० खेळाडू खरेदी करता येतील. त्यात जास्तीत जास्त ८ परदेशी खेळाडूंचा समावेश करता येईल. यासाठी त्यांच्याकडे ४५ कोटी रुपये शिल्लक आहेत.
पंजाब किंग्ज संघाने फक्त ९ कोटी ५० लाख रुपये खर्च करून २ खेळाडू रिटेन केलेत. त्यामुळे त्यांना आता एकूण २३ खेळाडू खरेदी करता येतील. त्यात जास्तीत जास्त ८ परदेशी खेळाडूंचा समावेश करता येईल. यासाठी त्यांच्याकडे सर्वाधिक ११० कोटी ५० लाख रुपये शिल्लक आहेत.
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाने ३७ कोटी खर्च करून ३ खेळाडू रिटेन केलेत. त्यामुळे त्यांना आता एकूण २२ खेळाडू खरेदी करता येतील. त्यात जास्तीत जास्त ८ परदेशी खेळाडूंचा समावेश करता येईल. यासाठी त्यांच्याकडे ८३ कोटी रुपये शिल्लक आहेत.
राजस्थान रॉयल्स संघाने ७९ कोटी खर्च करून ६ खेळाडू रिटेन केलेत. त्यामुळे त्यांना आता एकूण १९ खेळाडू खरेदी करता येतील. त्यात जास्तीत जास्त ७ परदेशी खेळाडूंचा समावेश करता येईल. यासाठी त्यांच्याकडे ४१ कोटी रुपये शिल्लक आहेत.
सनरायजर्स हैदराबाद संघाने ७५ कोटी खर्च करून ५ खेळाडू रिटेन केलेत. त्यामुळे त्यांना आता एकूण २० खेळाडू खरेदी करता येतील. त्यात जास्तीत जास्त ५ परदेशी खेळाडूंचा समावेश करता येईल. यासाठी त्यांच्याकडे ४५ कोटी रुपये शिल्लक आहेत.