इंडियन प्रीमिअर लीगच्या 2019च्या मोसमासाठी मंगळवारी खेळाडूंचा लिलाव जयपूर येथे झाला. 70 जागांसाठी 346 हून अधिक खेळाडू रिंगणात होते. त्यात वरुण चक्रवर्ती आणि जयदेव उनाडकट यांनी सर्वाधिक भाव खाल्ला. दिग्गज खेळाडूंना मागे टाकत या लिलावात अनेक अनपेक्षित बोली पाहायला मिळाल्या. कालच्या एका दिवसात पाच किंवा त्यापेक्षा जास्त कोटींची बम्पर लॉटरी लागलेले खेळाडू जाणून घेऊया..
जयदेव उनाडकट - राजस्थान रॉयल्स - ८.४ कोटी
वरुण चक्रवर्ती - किंग्स इलेव्हन पंजाब - ८.४ कोटी
सॅम कुरन - किंग्स इलेव्हन पंजाब - ७.२ कोटी
कॉलिन इनग्राम - दिल्ली कॅपिटल्स - ६.४ कोटी
कार्लोस ब्रॅथवेट - कोलकाता नाइट रायडर्स - ५ कोटी
अक्षर पटेल - दिल्ली कॅपिटल्स - ५ कोटी
शिवम दुबे - रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर - ५ कोटी
मोहित शर्मा - चेन्नई सुपरकिंग्स - ५ कोटी