IPL 2026 च्या १९ व्या हंगामाआधी मुंबईत सर्व १० फ्रँचायझी संघाच्या कर्णधारांची मैफील जमल्याचे पाहायला मिळाले. हा क्षण आयपीएलच्या इतिहासातील खास क्षण ठरला.
कारण तब्बल १९ वर्षांत पहिल्यांदाच आयपीएलच्या नव्या हंगामा आधी फोटो सेशन आणि चर्चेसाठी आयोजित करण्यात आलेल्या कर्णधारांच्या बैठकीत एकही परदेशी खेळाडू उपस्थित नव्हता.
IPL 2026 पूर्वी सर्व १० फ्रँचायझी संघांचे कर्णधार अधिकृत प्री-सीझन बैठकीसाठी मुंबईत एकत्र जमले होते.
याआधी आयपीएलमध्ये सर्व फ्रँचायझी संघाचे कर्णधार भारतीय असल्याचा क्षण पाहायला मिळाला आहे. पण पहिल्यांदाच हंगामाची सुरुवात १० भारतीय कर्णधार करणार आहेत.
यंदाच्या हंगामात SRH संघाचा कर्णधार पॅट कमिन्स पहिल्या टप्प्यातील सामन्याला मुकणार आहे. ईशान किशनने त्याची जागा घेतली आणि १९ व्या हंगामाला सुरुवात होण्याआधी १० कर्णधारांच्या साक्षीनं नवा इतिहास रचला गेला.
BCCI ने IPL 2026 च्या वेळापत्रकाचा पहिला टप्पा जाहीर केला असून तो २८ मार्च ते १२ एप्रिलदरम्यान खेळवला जाणार आहे. मुंबईत जमलेल्या कर्णधारांचे खास क्षण IPL च्या अधिकृत एक्स अकाउंटवरुन शेअर करण्यात आले आहेत.
दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार अक्षर पटेल सलग दुसऱ्या हंगामात संघाचे नेतृत्व करताना दिसणार आहेत. मुंबईतील खास सोहळ्यात फलंदाजी करतानाची त्याची खास झलक या फोटोत पाहायला मिळते.
कोलकाता नाईट रायडर्सचा कर्णधार आणि अनुभवी भारतीय क्रिकेटर अजिंक्य रहाणे आणि रिषभ पंत यांच्यासह या फोटोत शुभमन गिल ईशान किशन आणि अक्षर पटेलची झलक पाहायला मिळते.
RCB च्या संघाला पहिली IPL ट्रॉफी जिंकणारा कर्णधार रजत पाटीदारचा लूक लक्षवेधी ठरला.
भारताचा वनडे आणि कसोटी संघाचा कर्णधार शुभमन गिल यंदाच्या हंगामात पुन्हा एकदा गुजरात टायटन्सची नय्या पार करण्यासाठी जोर लावणार आहे.
मराठमोळा चेहरा ऋतुराज गायकवाड चेन्नई सुपर किंग्सच्या संघाचे नेतृत्व करताना पाहायला मिळाले. MS धोनीचा वारचा जपण्याचे मोठे चॅलेंज त्याच्यासोर असेल.