Join us
Daily Top 2Weekly Top 5

दोन, तीन नाही IPLमधील तब्बल ९ संघांकडून खेळलाय हा फलंदाज, रचला खास विक्रम, कोण आहे तो?

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 29, 2026 14:21 IST

Open in App
1 / 7

जगातील सर्वात लोकप्रिय क्रिकेट लीग असलेल्या आयपीएलच्या १९ व्या हंगामाला शनिवारपासून सुरुवात झाली आहे. आयपीएलमध्ये मैदानावर खेळाडूंनी अनेक विक्रम नोंदवले गेले आहेत. त्यातील काही विक्रम हे कालौघात मोडीत निघाले आहेत. तर काही विक्रम अबाधित आहेत. यामधीलच एक विक्रम आहे तो म्हणजे आयपीएलमध्ये सर्वाधिक संघांकडून खेळण्याचा.

2 / 7

या स्पर्धेत विराट कोहलीसारखे सुरुवातीपासून आतापर्यंत केवळ एकाच संघाकडून खेळणारे खेळाडू आहेत. मात्र असे अनेक खेळाडू आहेत जे आयपीएलमध्ये एकापेक्षा अधिक संघांकडून खेळले आहेत. मात्र यामध्ये एक असाही खेळाडू आहे जो तब्बल आयपीएलमधील ९ संघांकडून खेळला आहे. त्यामुळे आयपीएलमध्ये सर्वाधिक संघांकडून खेळण्याचा खास विक्रम त्याच्या नावावर नोंदवला गेला आहे. या फलंदाजाचं नाव आहे आरोन फिंच.

3 / 7

आरोन फिंचने आयपीएलमधील सर्वाधिक संघांकडून खेळण्याच केलेला विक्रम सहजासहजी मोडला जाण्याची शक्यता कमी आहे. फिंच ज्या ज्या संघांकडून खेळला आहे त्या त्या संघांसाठी सलामीवीर म्हणून त्याने भूमिका बजावली आहे. एवढंच नाही तर त्याने पुणे वॉरियर्स इंडिया या संघाचं नेतृत्वदेखील केलं होतं.

4 / 7

२०१० साली आयपीएलमधील आपल्या कारकिर्दीची सुरुवात करणाऱ्या आरोन फिंचने या लीगमधील जवळपास प्रत्येक प्रमुख संघाकडून खेळण्याचा विक्रम केला आहे. आरोन फिंच हा २०१० साली राजस्थान रॉयल्सकडून पहिल्यांदा आयपीएलमध्ये खेळला होता. तर २०२२ साली तो शेवटच्या हंगामात कोलकाता नाईटरायडर्सकडून खेळला होता. आता क्रिकेटच्या मैदानाबाहेरून तो सलामीवीर म्हणून काम पाहत आहे.

5 / 7

राजस्थान रॉयल्स (२०१०), दिल्ली डेअरडेव्हिल्स/कॅपिटल्स (२०११-१२), पुणे वॉरियर्स इंडिया (२०१३), सनरायझर्स हैदराबाद (२०१४), मुंबई इंडियन्स (२०१५), गुजरात लायन्स (२०१६-१७), किंग्स इलेव्हन पंजाब/पंजाब किंग्स (२०१८), रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (२०२०), कोलकाता नाईट रायडर्स (२०२२)

6 / 7

आरोन फिंच ९ संघ, जयदेव उनाडकट ८ संघ, मनीष पांडे ७ संघ, दिनेश कार्तिक ६ संघ, पार्थिव पटेल ६ संघ

7 / 7

दरम्यान, तुफानी फटकेबाजीसाठी प्रसिद्ध असलेल्या आरोन फिंचने आयपीएलमध्ये ९ संघांकडून एकूण ९२ सामने खेळले आहेत. त्यात त्याने २५.१९ च्या सरासरीने २०९१ धावा काढल्या आहेत. त्याची सर्वोच्च धावसंख्या नाबाद ८८ असून, त्याने १५ अर्धशतके देखील ठोकली आहेत.

टॅग्स :आयपीएल २०२६आयपीएल २०२४इंडियन प्रीमिअर लीगटी-20 क्रिकेट