Join us
Daily Top 2Weekly Top 5

IPL 2026 : काव्या मारनची कॅप्टन्सीची चॉईस अन् पुन्हा जुळून आला 'हा' कमालीचा योगायोग

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 24, 2026 19:21 IST

Open in App
1 / 12

IPL च्या यंदाच्या हंगामातील थरार २८ मार्च पासून रंगणार आहे. पॅट कमिन्सच्या अनुपस्थितीत ईशान किशनच्या रुपात हैदराबादच्या संघाल नवा कर्णधार मिळाला.

2 / 12

IPL च्या १९ व्या हंगामासाठी SRH च्या संघाने ईशान किशनकडे संघाचे नेतृत्व देताच IPL च्या इतिहासात नवा आणि खास विक्रम नोंदवला गेला. स्पर्धेतील आतापर्यंतच्या इतिहासात दुसऱ्यांदा सर्व १० संघाचे नेतृत्व भारतीय चेहऱ्यांकडे असणार आहे.

3 / 12

कमालीचा योगायोग म्हणजे या आधी २०१९ मध्ये काव्या मारनच्या मालकीच्या SRH संघातील नेतृत्व बदलामुळेच इंडियन प्रीमियर लीगमध्ये सर्व इंडियन कॅप्टन्स अशी झलक दिसली होती. त्यावेळी केन विल्यमसनच्या जागी भुवीनं SRH संघाचे नेतृत्व केले होते.

4 / 12

चेन्नई सुपर किंग्सचा संघ यंदाच्या हंगामातही ऋतुराज गायकवाडच्या नेतृत्वाखाली मैदानात उतरणार आहे. MS धोनीनंतर १९ सामन्यात CSK चे नेतृत्व करताना ऋतुराजनं संघाला ८ विजय मिळवून दिल्याचा रेकॉर्ड आहे.

5 / 12

भारतीय वनडे आणि कसोटी संघाचा कर्णधार शुभमन गिल आयपीएलमध्ये गुजरात टायटन्सचे नेतृत्व करताना दिसेल. IPL मध्ये कॅप्टन्सीत २७ सामन्यात १४ विजय आणि १३ पराभवासह गिलचे विनिंग पर्सेंटेज ५१ च्या घरात आहे.

6 / 12

भारताचा अनुभवी खेळाडू अजिंक्य रहाणे यंदाच्या हंगामात कोलकाता नाईट रायडर्सचे नेतृत्व करताना आहे. गत हंगामात १४ सामन्यात त्याच्या नेतृत्वाखाली संघाला फक्त ५ विजय नोंदवता आले होते. याशिवाय राजस्थान आणि पुणे संघाकडून २५ सामन्यात नेतृत्व करताना त्याने फक्त ९ सामने जिंकल्याचा रेकॉर्ड आहे.

7 / 12

हार्दिक पांड्याने गुजरात टायन्सला पदार्पणात ट्रॉफी जिंकून देत कॅप्टन्सीची खास छाप सोडली. पण मुंबई इंडियन्सच्या ताफ्यात आल्यावर त्याला नेतृत्वाची छाप सोडता आलेली नाही. यंदाच्या हंगामात MI कडून तो कॅप्टन्सीत खास छाप सोडणार का? ते पाहण्याजोगे असेल.

8 / 12

9 / 12

आयपीएलच्या इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू ठरलेल्या रिषभ पंतच्या खांद्यावर लखनौ संघाची जबाबदारी आहे. गत हंगामात तो कॅप्टन्सीसह फलंदाजीतील क्षमता दाखवून देण्यात अपयशी ठरला होता.

10 / 12

संजू सॅमसन CSK चा झाल्यावर राजस्थान रॉयल्सच्या संघाने रियान परागकडे संघाचे नेतृत्व सोपवले आहे.

11 / 12

पंजाबचा संघ श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखाली पुन्हा एकदा पहिली वहिली ट्रॉफी जिंकण्याच्या इराद्याने मैदानात उतरेल.

12 / 12

टॅग्स :आयपीएल २०२६रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरसनरायझर्स हैदराबादकाव्या मारनमुंबई इंडियन्सचेन्नई सुपर किंग्सआयपीएल २०२४इंडियन प्रीमिअर लीग