Join us

IPL 2025: MS Dhoni च्या विकेटनंतर राग व्यक्त करणारी 'ती' CSK ची मिस्ट्री गर्ल सापडली! जाणून घ्या कोण?

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 2, 2025 16:09 IST

Open in App
1 / 10

राजस्थान रॉयल्स विरूद्ध रविवारच्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्ज संघाला सलग दुसऱ्या पराभवाला सामोरे जावे लागले. या सामन्यात एका मिस्ट्री गर्लची खूपच चर्चा रंगली.

2 / 10

१८२ धावांचा पाठलाग करताना महेंद्रसिंग धोनी बाद झाला. मोक्याच्या क्षणी त्याचा झेल पकडला गेल्यानंतर त्या तरुणीच्या रिअँक्शनचा व्हिडीओ खूपच व्हायरल झाला.

3 / 10

धोनी CSK ला सामना जिंकवून देऊ शकतो असा तिला ठाम विश्वास होता, पण धोनी बाद झाला. त्याचा तिला प्रचंड राग आला पण तिने रागाला आवर घातला असा तो व्हिडीओ होता.

4 / 10

हा तरुणीचा व्हिडीओ तुफान व्हायरल झाला. सोशल मीडियावर या तरुणीबाबत प्रचंड चर्चा सुरु असल्याचे पाहायला मिळाले. जाणून घेऊया ती तरुणी नेमकी कोण?

5 / 10

CSK च्या सामन्यात व्हायरल झालेल्या व्हिडीओमधील तरुणीचे नाव आर्यप्रिया भुयान (Aaryapriya Bhuyan) असे असल्याचे सांगितले जात आहे.

6 / 10

आर्यप्रिया भुयान ही अवघ्या १९ वर्षांची तरुणी आहे. ती मूळची गुवाहाटीची आहे. एका व्हिडीओमुळे रातोरात ती इंटरनेट सेन्सेशन बनली असल्याचे दिसत आहे.

7 / 10

तिच्या व्हायरल व्हिडीओबाबत तिने एचटीशी बोलताना सांगितले, 'मला कल्पनाही नव्हती मी टीव्हीवर दिसत आहे. मला धोनी बाद झाल्याचा धक्का बसला होता.'

8 / 10

'मी इन्स्टाग्रामवर थोडेच फोटो पोस्ट करते. त्यामुळे माझे १००० हून कमी फॉलोअर्स होते, पण त्या व्हायरल व्हिडीओनंतर त्यात वाढ झाली,' असे ती म्हणाली.

9 / 10

एका वृत्तानुसार, सामन्याआधी आर्यप्रियाचे केवळ ८०० फॉलोअर्स होते. पण व्हायरल व्हिडीओनंतर तिचे 157K पेक्षाही जास्त फॉलोअर्स झाले आहेत आणि झपाट्याने वाढत आहेत.

10 / 10

'१० वर्षांची असल्यापासून मी CSKची फॅन आहे. सध्या टीममध्ये काही बदल गरजेचे आहेत, त्यानंतर टीम नक्कीच कमबॅक करेल' असा विश्वास तिने व्यक्त केला.

टॅग्स :इंडियन प्रिमियर लीग २०२५चेन्नई सुपर किंग्समहेंद्रसिंग धोनीव्हायरल व्हिडिओव्हायरल फोटोज्सोशल मीडिया