IPL 2025: जिंकलेल्या सामन्यांमध्ये सर्वाधिक धावा करणारे टॉप ५ फलंदाज!

आयपीएल २०२५ मध्ये आतापर्यंत जिंकलेल्या सामन्यांमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या टॉप फलंदाजांच्या यादीत फक्त एक परदेशी खेळाडू आहे.

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा स्टार फलंदाज विराट कोहलीने आयपीएल २०२५ मध्ये आतापर्यंत जिंकलेल्या सामन्यांमध्ये सर्वाधिक धावा केल्या आहेत. त्याने आठ डावांमध्ये ४७५ धावा केल्या आहेत.

इंग्लंडचा धडाकेबाज क्रिकेटपटू जोस बटलर या यादीत दुसऱ्या स्थानावर आहे. गुजरात टायटन्सचा भाग असलेल्या बटलरने ८ डावांमध्ये ३८० धावा केल्या आहेत. जीटीने ११ पैकी आठ सामने जिंकले आहेत.

गुजरात टायटन्सचा युवा सलामीवीर साई सुदर्शन यादीत तिसऱ्या स्थानावर आहे. त्याने आतापर्यंत ८ डावांमध्ये ३४० धावा केल्या आहेत.

गुजरात टायटन्सचा कर्णधार शुभमन गिलने ८ डावांमध्ये ३३१ धावा केल्या आहेत. गिल आणि सुदर्शन यांनी गुजरातच्या संघाला सातत्याने चांगली सुरुवात दिली. ज्यामुळे विरोधी संघाचे मनोबल खचत आहे.

सूर्यकुमार यादव यादीत पाचव्या स्थानावर आहे. मुंबई इंडियन्सचा स्टार फलंदाज सूर्याने ७ डावांमध्ये ३०३ धावा केल्या. मुबंईचा संघ १२ सामन्यांत सात विजयांसह गुणतालिकेत चौथ्या स्थानावर आहे. सूर्याकडे सध्या ऑरेंज कॅप आहे. त्याने १२ सामन्यांमध्ये ५१० धावा केल्या आहेत.