गत चॅम्पियन कोलकाता नाईट रायडर्सचा यंदाच्या हंगामातील प्रवास प्लेऑफ्सआधीच संपला. पण या संघाकडून खेळणाऱ्या सुनील नरेन याने मोठा डाव साधलाय.
सनरायझर्स हैदराबाद विरुद्धच्या सामन्यात सुनील नरेन याने दोन विकेट्स घेतल्या. यासह कोलकाता संघाकडून २०९ विकेट्स घेत त्याने नवा वर्ल्ड रेकॉर्ड सेट केला आहे.
टी-२० क्रिकेटमध्ये एका संघाकडून सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत तो सर्वात टॉपला पोहचलाय. इथं एक नजर टाकुयात या यादीतील अन्य गोलंदाजांवर
समित पटेल याने नॉटिंघमशायर संघाकडून टी-२० मध्ये २०८ विकेट्स घेतल्या आहेत. तो इंग्लंडकडून ६० आंतरराष्ट्रीय सामने खेळला आहे.
इंग्लंडचा क्रिस वूड देखील या यादीत आहे. त्याने हँम्पशायर संघाकडून १९९ विकेट्स घेतल्या आहेत.
श्रीलंकेचा दिग्गज गोलंदाज लसिथ मलिंगा याने मुंबई इंडियन्सकडून १९५ विकेट्स घेतल्याचा रेकॉर्ड आहे.
डेविड पेन याने ग्लूस्टरशायर संघाकडून १९३ विकेट्स घेतल्या आहेत. २०२२ मध्ये त्याने इंग्लंडकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पणाची संधी मिळाली. पण तो फक्त एकच वनडे सामना खेळलाय.
जसप्रीत बुमराह मुंबई इंडियन्सच्या संघाकडून आतापर्यंत १८४ विकेट्स घेतल्या आहेत. २०१३ पासून तो या संघाकडून खेळतोय.