आयपीएलमध्ये सर्वाधिक षटकार मारण्याचा विक्रम हा कॅरेबियन स्टार ख्रिस गेलच्या नावे आहे. त्याने आपल्या आयपीएल कारकिर्दीत वेगवेगळ्या फ्रँचायझी संघाकडून खेळताना ३५७ षटकार मारले आहेत.
आयपीएलमध्ये सर्वाधिक षटकार मारणाऱ्या आघाडीच्या ५ फलंदाजांमध्ये ३ भारतीय आणि २ परदेशी फलंदाजांचा समावेश आहे.
ख्रिस गेलशिवाय दक्षिण आफ्रिकेचा स्टार बॅटर एबी डिव्हिलियर्स हा देखील २५१ षटकारांसह आघाडीच्या पाच फलंदाजांमध्ये असल्याचे दिसून येते.
इथं नजर टाकुयात आयपीएलच्या इतिहासात सर्वाधिक षटकार मारणाऱ्या भारतीय फलंदाजांवर
आयपीएलमध्ये भारताकडून सर्वाधिक सिक्सर मारणाऱ्या भारतीय फलंदाजांच्या यादीत रोहित शर्मा आघाडीवर आहे. त्याने २६५ सामन्यात २९५ षटकार मारले आहेत.
विराट कोहलीनं राजस्थान रॉयल्स विरुद्धच्या सामन्यात ७० धावांची खेळी करताना रोहितच्या आणखी जवळ पोहचलाय. त्याच्या खात्यात आता २६१ सामन्यानंतर २८५ षकारांची नोंद झालीये.
महेंद्रसिंह धोनीने आतापर्यंत २७२ सामने २६० षटकार मारल्याचा रेकॉर्ड आहे. यंदाच्या हंगामात तो यात आणखी किती षटकारांची भर घालणार ते पाहण्याजोगे असेल.
भारतीय विकेट किपर बॅटर संजू सॅमसन याने १७५ सामन्यात २१६ षटकार मारल्याचा रेकॉर्ड आहे.
केएल राहुल सध्या दिल्ली कॅपिटल्सच्या संघाने आपला क्लास दाखवताना दिसतोय. आयपीएलमध्ये १३९ सामन्यानंतर त्याच्या खात्यात २०३ षटकार जमा आहेत. त्याच्यासोबत रैनाही २०३ षटकारांसह संयुक्तरित्या पाचव्या क्रमांकावर आहे.