रजत पाटीदार याने IPL मध्ये पहिल्यांदाच RCB संघाचे नेतृत्व करताना संघाला ट्रॉफी जिंकून दिली. कॅप्टन्सीच्या पदार्पणात संघाला ट्रॉफी जिंकून देणाऱ्या खास क्लपमध्ये त्याची एन्ट्री झाली आहे.
२००८ च्या पहिल्या हंगामात ऑस्ट्रेलियन दिवंगत आणि दिग्गज फिरकीपटू शेन वॉर्न याने राजस्थान रॉयल्सला चॅम्पियन केले होते.
२००९ मध्येही ऑस्ट्रेलियन विकेट किपर बॅटर ॲडम गिलख्रिस्ट कॅप्टन्सीच्या पदार्पणात डेक्कन चार्जर्सच्या संघाला ट्रॉफी जिंकून दिली होती.
२०१३ च्या हंगामात रोहित शर्मानं मुंबई इंडियन्सची कॅप्टन्सी करताना संघाला चॅम्पियन केले होते. त्याच्या नेतृत्वाखाली MI नं पाच वेळा ट्रॉफी जिंकली आहे.
आयपीएलच्या आतापर्यंतच्या इतिहासात एका फ्रँचायझीचे नेतृत्व करताना संघाला एकापेक्षा अधिक ट्रॉफी जिंकून देणाऱ्या कर्णधारांच्या यादीत रोहित शर्मासह धोनी आणि गौतम गंभीरचा समावेश आहे.
२०२३ च्या हंगामात चेन्नई सुपर किंग्जला पाचवे जेतेपद मिळवून देत महेंद्रसिंह धोनीनं रोहित शर्माची बरोबरी केल्याचे पाहायला मिळाले होते.
गौतम गंभीरनं २०१२ आणि २०१४ च्या हंगामात कोलकाता नाईट रायडर्सला जेतेपद मिळवून दिले होते.