IPL 2025 Purple Cap : प्रसिद्ध टॉपर! पण MI सह RCB च्या ताफ्यातील हुकमी एक्का अजूनही या शर्यतीत

प्रसिद्ध कृष्णा अव्वलस्थानी कायम राहणार की मुंबई इंडियन्ससह रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुच्या ताफ्यातील गोलंदाज सर्वाधिक विकेट्सचा डाव साधणार ते पाहण्याजोगे असेल.

आयपीएलच्या यंदाच्या हंगामात प्रसिद्ध कृष्णानं खास छाप सोडलीये, गुजरात टायटन्सच्या ताफ्यातून खेळताना या गोलंदाजाने १५ सामन्यात २५ विकेट्स घेतल्या आहेत. एलिमिनेटरमध्येच संघ आउट झाल्यावर तो अव्वलस्थानावर कायम राहणं मुश्किल आहे.

यंदाच्या हंगामात सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत नूर अहमद १४ सामन्यातील २४ विकेट्ससह दुसऱ्या स्थानावर आहे. पण CSK चा संघ प्लेऑफ्सआधीच आउट झाला अन् त्याची पर्पल कॅपची संधीच हुकली.

आरसीबीच्या ताफ्यातील हुकमी एक्का जोश हेजलवूड याने ११ सामन्यात २१ विकेट्स घेतल्या आहेत. प्रसिद्ध कृष्णाला ओव्हर टेक करून पर्पल कॅप पटकवण्यासाठी त्याला फायनलमध्ये पंजा मारावा लागेल.

मुंबई इंडियन्सच्या ताफ्यातून ट्रेंट बोल्डही कमालीची कामगिरी करताना दिसतोय. १५ सामन्यात त्यानेही जोश हेजलवूडच्या बरोबरीनं २१ विकेट्स घेतल्या आहेत. MI चा संघ फायनलमध्ये पोहचला तर क्वालिफायर आणि फायनलसह दोन सामने बोल्टला मिळवत तो टॉपर होऊ शकतो.

गुजरातच्या ताफ्यातील फिरकीपटू साई किशोर याने १५ सामन्यात १९ विकेट्स घेतल्या आहेत. जसप्रीत बुमराह त्याला टॉप ५ मधून बाहेर काढू शकतो.

मुंबई इंडियन्सचा प्रमुख गोलंदाज जसप्रीत बुमराहने ११ सामन्यात १८ विकेट्स घेतल्या आहेत. क्वालिफायर २ च्या लढत जिंकून MI नं फायनल गाठली तर त्यालाही टॉपर होण्याची संधी आहे. पण यासाठी त्याला अजून ८ विकेट्स घ्याव्या लागतील.

पंजाब किंग्जच्या संघातील अर्शदीप सिंगही १५ सामन्यात १८ विकेटसह बुमराहच्या बरोबरीनं आहे. त्याच्यासमोर टॉपला जाण्याचे समीकरणही बुमराहप्रमाणेच आहे.

कोलकाता नाईट रायडर्सकडून वैभव अरोरा याने १२ सामन्यात १७ विकेट्स आपल्या खात्यात जमा केल्याचे पाहायला मिळाले.

मिस्ट्री स्पिनर वरुण चक्रवर्ती हा १३ सामन्यात १७ विकेट्स घेत नवव्या स्थानावर आहे.

ऑस्ट्रेलियन कर्णधार पॅट कमिन्सच्या नेतृत्वाखाली सनरायझर्स हैदराबादचा प्रवासही प्लेऑफ्सआधीच संपला. पॅटनं १४ सामन्यात १६ विकेट्स आपल्या खात्यात जमा केल्या.