Join us

जगात भारी... Mumbai Indiansच्या जसप्रीत बुमराहने IPL मध्ये केला सर्वात 'जम्बो' विक्रम, 'हा' पराक्रम करणारा ठरला पहिलाच क्रिकेटर

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 23, 2025 18:15 IST

Open in App
1 / 8

मुंबई इंडियन्सच्या संघाने सुरुवातीच्या खराक कामगिरीनंतर दमदार फलंदाजी करत प्लेऑफ्सचे तिकीट मिळवले. मुंबईच्या यशात जसप्रीत बुमराहने महत्त्वाचे योगदान दिले.

2 / 8

जसप्रीत बुमराह हा टीम इंडियाप्रमाणेच मुंबई इंडियन्सचाही हुकूमी एक्का आहे. मोक्याच्या वेळेला जसप्रीत बुमराहने मुंबईच्या संघाला विकेट्स मिळवून दिल्या आहेत.

3 / 8

२०१३ पासून जसप्रीत बुमराह मुंबईच्या संघाकडून खेळतोय. गेल्या १२ हंगामात त्याने अनेक विक्रम रचले. त्यातच एका सर्वात मोठ्या विक्रमाची भर पडली आहे.

4 / 8

जगातील कुठल्याही गोलंदाजाला जमलेला नाही असा एक मोठ्ठा विक्रम जसप्रीत बुमराहने केला आहे. मुंबई इंडियन्सकडून खेळताना त्याने ही किमया साधली आहे.

5 / 8

यंदाच्या हंगामात जसप्रीत बुमराहने ९ सामने खेळले असून १६ बळी घेतले आहेत. एका हंगामात १५ किंवा त्यापेक्षा जास्त बळी घेण्याचा त्याचा हा नववा हंगाम आहे.

6 / 8

IPLच्या इतिहासात कुठल्याही खेळाडूला ९ हंगामात १५ किंवा त्यापेक्षा जास्त बळी घेता आलेले नाही. केवळ जसप्रीत बुमराहनेच ही ऐतिहासिक कामगिरी केली आहे.

7 / 8

२०१३, २०१४ आणि २०१५ हे तीन हंगाम वगळता ज्या ज्या वेळी जसप्रीत बुमराह IPL खेळला, त्या प्रत्येक हंगामात त्याने १५ किंवा त्यापेक्षा जास्त बळी घेतले आहे.

8 / 8

आतापर्यंतच्या सर्व हंगामात IPL 2020 हा जसप्रीत बुमराहचा सर्वोत्तम हंगाम ठरला आहे. त्या हंगामात बुमराहने १५ सामने खेळून तब्बल २७ बळी मिळवले होते.

टॅग्स :इंडियन प्रिमियर लीग २०२५जसप्रित बुमराहआयपीएल २०२४मुंबई इंडियन्स