आयपीएल २०२५ च्या हंगामासाठी चेन्नई सुपर किंग्सचा ताफा सज्ज झाला आहे. चेन्नईच्या कॅम्पमध्ये धोनीची एन्ट्री झाल्याचे पाहायला मिळाले.
यंदाच्या हंगामात पुन्हा एकदा धमाकेदार सुरुवात करण्याआधी संघातील सहकारी बर्थडे पार्टीसाठी एकत्रित आल्याचे पाहायला मिळाले.
CSK ताफ्यातील खेळाडूंनी संघाचे मालक आणि सीईओ काशी विश्वनाथन यांचा बर्थडे मैदानातच साजरा केल्याचे पाहायला मिळाले. चेन्नई सुपर किंग्सच्या अधिकृत सोशल मीडिया अकाउंटवरुन या क्षणाचे खास फोटो शेअर करण्यात आले आहेत. यावेळी आर. अश्विनचीही झलक पाहायला मिळाली.
चेन्नई सुपर किंग्सचा माजी कॅप्टन धोनी आणि ऋतुराज गायकवाड या दोघांचे संघ मालकांसोबत असलेले खास बॉन्डिंग या फोटोत दिसून येते.
२००८ ते २०१५ च्या हंगामात चेन्नईच्या ताफ्यातून खेळल्यावर आर. अश्विन अन्य फ्रँचायझी संघात खेळताना दिसला. यंदाच्या हंगामात त्याची CSK च्या ताफ्यात पुन्हा घरवापसी झालीये. मेगा लिलावात ९.७५ कोटी रुपये खर्च करून चेन्नईनं त्याला आपल्या ताफ्यात सामील करून घेतलं आहे.
धोनीसह पुन्हा अश्विनला खेळताना पाहण्यासाठी CSK चे चाहते उत्सुक आहेत.
येसो जर्सीत एकत्र मैदानात उतरण्याआधी एम एस धोनी आणि आर अश्विन यांची ब्लू जर्सीतील झलक चर्चेचा विषय ठरत आहे.
CSK मध्ये घरवापसी केल्यावर आर. अश्विन आणि एमएस धोनी यांच्यातील कमालीच्या बॉन्डिंगची स्टोरी या फोटोमध्ये दिसत आहे. ताफ्यात सामील झाल्यावर तो धोनीला फॉलो करतच मैदानात पोहचल्याचा सीन पाहायला मिळाला.