मुंबई इंडियन्सचा संघ सध्या विचित्र कात्रीत सापडला आहे. अतिशय प्रतिभावान खेळाडूंची फौज संघात असूनही यंदाच्या हंगामातील ४ पैकी ३ सामन्यात त्यांना पराभवाचा सामना करावा लागला आहे.
चेन्नई सुपर किंग्ज, गुजरात टायटन्स आणि लखनौ सुपर जायंट्स या तीनही संघांनी मुंबईला पराभवाचे पाणी पाजले. केवळ कोलकाता नाईट रायडर्स संघावर मुंबईला विजय मिळवता आला.
हार्दिक पांड्याला कर्णधार केल्यापासून मुंबई इंडियन्सच्या संघाला फारशी उल्लेखनीय कामगिरी करता आलेली नाही. या पराभवामागे विविध कारणे असल्याची चर्चा चाहत्यांमध्ये रंगली आहे.
मुंबई इंडियन्सचा आजचा सामना रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूशी होणार आहे. मुंबईच्या वानखेडे मैदानावर हा सामना खेळला जाणार असून हार्दिक पांड्या संघात २ मोठे बदल करण्याची दाट शक्यता आहे.
दुखापतग्रस्त रोहित शर्मा आणि तीन महिने क्रिकेटपासून दूर असलेला जसप्रीत बुमराह दोघेही आता खेळण्यासाठी सज्ज झाले आहेत. ते दोघेही आजच्या संघात दिसतील हे जवळपास निश्चित आहे.
अशा परिस्थितीत जसप्रीत बुमराहला संघात घेतल्यास अश्वनी कुमारला संघातून डच्चू मिळू शकतो. त्याने पहिल्या सामन्यात ४ बळी घेतले होते, पण दुसऱ्या सामन्यात तो फारसा प्रभावी ठरू शकला नाही.
रोहित शर्मादेखील फिट असून संघात पुनरागमन करेल असे मानले जात आहे. रोहित संघात परतल्यास राज बावा किंवा विल जॅक्स या दोघांपैकी एकाला संघातून बाहेर केले जाऊ शकते.