KKR, IPL Retention: IPL 2025 साठी कोलकाता नाइट रायडर्स संघाने रिटेन केलेल्या खेळाडूंची यादी काही दिवसांपूर्वीच जाहीर केली.
कोलकाताने भारताचा तडाखेबाज फलंदाज रिंकू सिंग याला सर्वाधिक १३ कोटी रुपयांची रक्कम देऊन संघात कायम ठेवले.
कोलकाताने आंद्रे रसेल, सुनील नरिन आणि वरूण चक्रवर्ती या तीन खेळाडूंनाही प्रत्येकी १२ कोटींच्या रकमेसह रिटेन केले.
युवा खेळाडूंवरही कोलकाताने विश्वास दाखवला. हर्षित राणा आणि रमणदीप सिंग या दोघांना त्यांनी ४ कोटींना रिटेन केले.
KKRने दोन असे खेळाडू करारमुक्त केले जे आता तुफान फॉर्मात आहेत. त्यामुळे अशा खेळाडूंना रिलीज करणे KKRची मोठी चूकच ठरल्याची चर्चा आहे.
कोलकाताने कर्णधार श्रेयस अय्यरला रिलीज केले. पण आज त्याच श्रेयसने रणजी ट्रॉफीमध्ये ओडिशाविरुद्ध द्विशतक झळकावले.
दुसरीकडे केकेआरने वेंकटेश अय्यरलाही रिलीज केले. पण मध्य प्रदेशकडून खेळताना त्याने बिहारविरुद्ध तुफानी १७४ धावांची खेळी केली.