Join us

IPL 2025 : डियर क्रिकेट...! बायकोनं शेअर केली करुण नायरच्या 'कमबॅक'मागची खास स्टोरी

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 14, 2025 18:58 IST

Open in App
1 / 10

देशांतर्गत क्रिकेटमध्ये धमाकेदार कामगिरी करणाऱ्या करुण नायरनं तीन वर्षानंतर IPL मध्ये धमाकेदार पदार्पण केल्याचे पाहायला मिळाले.

2 / 10

मुंबई इंडियन्स विरुद्धच्या सामन्यात धावांचा पाठलाग करताना दिल्ली कॅपिटल्सनं त्याला इम्पॅक्ट प्लेयरच्या रुपात संधी दिली. या संधीच सोन करताना त्याने लक्षवेधी खेळी करून दाखवली.

3 / 10

अभिषेक पोरेलच्या साथीनं दुसऱ्या विकेटसाठी ११९ धावांची दमदार भागीदारी करत त्याने मुंबई इंडियन्सचे टेन्शन वाढवले होते.

4 / 10

करुण नायर याने IPL कमबॅक सामन्यात २२२.५० च्या स्ट्राइक रेटसह १२ चौकार आणि ५ षटकाराच्या मदतीने ४० चेंडूत ८९ धावांची खेळी करत IPL मध्ये दमदार कमबॅक केले. त्याची एकंदरीत खेळी अन् बुमराहविरुद्ध त्याने केलेली फटकेबाजी सध्या चर्चेचा विषय ठरत आहे.

5 / 10

करूण नायरच्या दमदार IPL कमबॅकनंतर आता त्याची पत्नी सनाया टंकारीवाला नायरन हिने इन्स्टा स्टोरीच्या माध्यमातून खास फोटो शेअर करत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. ज्याची सोशल मीडियावर चर्चा रंगताना दिसत आहे.

6 / 10

'माना की मुश्किल है सफर पर सुन ओ मुसाफिर कहीं अगर तू रुका तो मंजिल आएगी ना फिर..' या गाण्यासह सनाया हिने दिल्ली कॅपिटल्सनं जुन्या ट्विटसह करुण नायरचा शेअर केलेला खास फोटो इन्स्टा स्टोरीच्या स्वरुपात लावला आहे. डियर क्रिकेट, मला एक संधी हवी..हे क्रिकेटरच ट्विट अन् कमबॅकची क्लास इनिंगचा हा फोटो आहे.

7 / 10

करुण नायरच्या कमबॅक इनिंगनंतर त्याची पत्नी सनाया हिने दिल्ली कॅपिटल्ससोबततच्या जुन्या आठवणींना उजाळा देणाऱ्या फोटोसह नवा फोटो शेअर केला. यातील एक फोटो २०१७ च्या हंगामातील आहे. ज्यात ती नायरसोबत दिसते. दुसऱ्या फोटोमध्ये ही जोडी आपल्या दोन दोन मुलांसह दिसते.

8 / 10

यंदाच्या हंगामाआधी २०२२ मध्ये करूण नायर राजस्थानच्या ताफ्याकडून खेळताना दिसला होता. त्यानंतर तीन वर्षांनी तो पुन्हा या लीगमध्ये खेळताना दिसतोय.

9 / 10

करुण नायरनं पंजाब संघाचेही प्रतिनिधीत्व केले असून यावेळीही त्याची पत्नी सनाया त्याला चीअर करताना दिसली होती.

10 / 10

सनायानं आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर नवरोबासोबतच्या आयपीएलमधील खास आठवणी जपल्याचेही पाहायला मिळते.

टॅग्स :इंडियन प्रिमियर लीग २०२५ऑफ द फिल्डइंडियन प्रीमिअर लीगदिल्ली कॅपिटल्समुंबई इंडियन्स