IPL 2024 Point Table : ८ पैकी ३ विजय अन् RR प्ले ऑफमध्ये; पण उरलेल्या ३ जागांसाठी कडवी टक्कर, मुंबईची तर...

IPL 2024 Point Table : इंडियन प्रीमिअर लीग २०२४ मध्ये राजस्थान रॉयल्स असा संघ आहे, ज्याने सर्व आघाड्यांवर आतापर्यंत दमदार कामगिरी केली आहे. सलग चार विजय मिळवल्यानंतर पाचव्या सामन्यात गुजरात टायटन्सने त्यांना पराभूत केले होते, परंतु आज त्यांनी पंजाब किंग्सला त्यांच्याच घरी जाऊन लोळवले.

पंजाब किंग्सविरुद्धच्या या विजयासह RR च्या खात्यात १० गुण झाले आहेत आणि त्यांची अव्वल स्थानावरील पकड मजबूत झाली आहे. ६ पैकी ५ सामने जिंकून RR ने त्यांचा बाद फेरीचा मार्ग सुकर केला आहे आणि त्यांना उर्वरित ८ सामन्यांत किमान ३ विजय हे बाद फेरीसाठी पुरेसे आहेत.

राजस्थान रॉयल्सने गोलंदाजांच्या उल्लेखनीय कामगिरीमुळे पंजाब किंग्सला ८ बाद १४७ धावांपर्यंत रोखले. प्रत्युत्तरात राजस्थानचीही गाडी थोडी भरकटली होती आणि त्यामुळे पंजाब किंग्सला विजयाच्या आशा दिसल्या. पण, हातचा घास त्यांनी ढिसाळ क्षेत्ररक्षण व चुकलेल्या डावपेचांमुळे गमावला. शिमरोन हेटमायरने १० चेंडूंत २७ धावा कुटून १९.५ षटकांत सामना संपवला. राजस्थानने ७ बाज १५२ धावा केल्या.

राजस्थान रॉयल्सनी ६ सामन्यांत W,L,W,W,W,W अशी कामगिरी करून १० गुण खात्यात जमा केले आहेत. प्ले ऑफमधील जागा पक्की करण्यासाठी किमान १६ व कमाल २० गुण पुरेसे आहेत आणि राजस्थानने एक पाऊल प्ले ऑफच्या दिशेने टाकलेच आहे.

राजस्थानप्रमाणे गुजरात टायटन्स, पंजाब किंग्स, दिल्ली कॅपिटल्स व ऱॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांचे प्रत्येकी ६ सामने खेळून झाले आहेत. GT ने ३ विजय व ३ पराभव पत्करले आहेत आणि ते सहाव्या क्रमांकावर आहेत. त्यांना उर्वरित ८ सामन्यांत १६ ही मॅजिक फिगर गाठण्यासाठी पाच विजय आवश्यक आहेत.

पंजाब किंग्सला ६ पैकी २ सामने जिंकता आलेले आहेत. त्यांना मागील सामना अवघ्या २ धावांनी गमवावा लागला, तसे नसते झाले तर ते GT सोबत असते. पण, सध्या त्यांची अवस्था DC सारखी आहे. PBKS व DC यांना आता उर्वरित ८ सामन्यांत किमान ५ विजय हवे आहेत. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू ६ मध्ये १ विजय मिळवू शकले आहेत आणि त्यांना ८ पैकी ६ सामने जिंकणे गरजेचे आहे.

चेन्नई सुपर किंग्स, लखनौ सुपर जायंट्स, सनरायझर्स हैदराबाद, मुंबई इंडियन्स यांनी प्रत्येकी ५ सामने खेळले आहेत. यापैकी CSK, SRH व LSG हे अपर हँड आहेत. त्यांनी ३ सामने जिंकून खात्यात ६ गुण जमा केले आहेत आणि उर्वरित ९ पैकी त्यांना किमान ६ विजय महत्त्वाचे आहेत. त्यापेक्षा अधिक ही त्यांनी क्वालिफायर १ च्या शर्यतीत ठेवतील.

राहिला प्रश्न मुंबई इंडियन्सचा... त्यांनी पाचमध्ये २ विजय मिळवले आहेत आणि ४ गुणांसह ते सातव्या क्रमांकावर आहेत. त्यांना ९ पैकी किमान ७ विजय हवे आहेत. सध्यातरी राजस्थान रॉयल्स सेफ दिसत आहे.