आयपीएल फ्रँचायझी दिल्ली कॅपिटल्सचा गोलंदाज प्रवीण दुबे विवाहबंधनात अडकला आहे. त्याने सोशल मीडियावर फोटो पोस्ट करत याची माहिती दिली.
दिल्ली कॅपिटल्सच्या फ्रँचायझीने देखील आपल्या शिलेदाराचे अभिनंदन करत शुभेच्छा दिल्या आहेत. दिल्लीच्या फ्रँचायझीने प्रवीणला संघात कायम ठेवले आहे.
प्रवीण दुबे २०२१ मध्ये दिल्ली कॅपिटल्सच्या संघासोबत जोडला गेला. मात्र, त्याला केवळ चार सामने खेळण्याची संधी मिळाली.
प्रवीणने पत्नी मून दुबेसोबतचे काही फोटो पोस्ट केले आहेत. सहकारी खेळाडूंसह चाहते त्याला नवीन सुरूवातीसाठी शुभेच्छा देत आहेत.
प्रवीण २०२१ पासून दिल्ली कॅपिटल्सच्या संघाचा भाग आहे. त्याला फ्रँचायझीने २० लाख रूपय देऊन खरेदी केले होते.
२०२२ मध्ये प्रवीणचे मानधन वाढून ५० लाख झाले. त्याला २०२३ आणि २०२४ च्या हंगामासाठी रिटेन करण्यात आले. त्याने आतापर्यंत ४ सामने खेळले असून १ बळी घेतला आहे.
प्रवीणने पंजाब किंग्जसाठी देखील एक आयपीएल सामना खेळला आहे. त्याने देशांतर्गत क्रिकेटमध्ये सातत्याने चांगली कामगिरी केली.
लिस्ट एमध्ये प्रवीणने १३ सामन्यांत २१ बळी घेतले आहेत. तर, २४ ट्वेंटी-२० सामन्यांत २४ बळी घेण्यात युवा शिलेदाराला यश आले. त्याने एक प्रथम श्रेणी सामना खेळला आहे.