सनरायझर्स हैदराबाद आणि दिल्ली कॅपिटल्स यांचे आव्हान संपुष्टात आले आहे. लखनौ सुपर जायंट्सने ( LSG) ५ धावांनी थरारक विजय मिळवून १५ गुणांसह Point Table वर तिसरे स्थान पटकावलेय आणि प्ले ऑफच्या ते जवळ पोहोचले आहेत. मात्र, त्यांचे स्थान अजूनही पक्के झालेले नाही...
गुजरात टायटन्सने सोमवारी सनरायझर्स हैदराबादला पराभूत करून १८ गुणांसह प्ले ऑफमधील स्थान पक्के केले आहे. त्यांचा आणखी एक सामना शिल्लक आहे. चेन्नई सुपर किंग्स १५ आणि लखनौ सुपर जायंट्स १५ गुणांसह प्ले ऑफच्या शर्यतीत आघाडीवर आहेत.
LSGने मुंबई इंडियन्सला नमवून १५ गुण केले आहेत, परंतु अजूनही त्यांचे प्ले ऑफमधील स्थान पक्के नाही. CSK ने उर्वरित १ सामना जिंकल्यास ते १७ गुणांसह प्ले ऑफसाठी पात्र ठरतील. अशा परिस्थितीत लखनौ सुपर जायंट्स तिसऱ्या स्थानावर कायम राहतील.
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि पंजाब किंग्स हे प्रत्येकी १२ गुणांसह अजूनही प्ले ऑफच्या शर्यतीत आहेत. दोघांचे प्रत्येकी २ सामने शिल्लक आहेत आणि ते जिंकल्यास त्यांचेही १६ गुण होतील आणि मुंबई इंडियन्सची डोकेदुखी वाढेल.
मुंबईने अखेरचा सामना गमावल्यास त्यांची गाडीही १६ गुणांवर अडकेल आणि यावेळी नेट रन रेट महत्त्वाचा ठरेल. MIचा शेवटचा सामना SRHशी आहे. RCB समोर हैदराबाद आणि गुजरात, तर PBKS समोर दिल्ली व राजस्थानचे आव्हान आहे. मुंबईचा नेट रन रेट -०.१२८ असा आहे आणि त्यांना अखेरचा सामना मोठ्या फरकाने जिंकावा लागेल.