भारताचा वर्ल्ड कप विजेता कर्णधार महेंद्रसिंग धोनी ( MS Dhoni) याची ही शेवटची इंडियन प्रीमिअर लीग असल्याची चर्चा सुरू आहे. अशी चर्चा मागील २-३ वर्षांपासून सुरू होत्या आणि चेन्नई सुपर किंग्सच्या ( CSK) कॅप्टनने त्यांना चकवा दिला.
पण, धोनीचं वाढतं वय पाहता यावेळी तसं होण्याची शक्यता कमीच आहे. त्यामुळे MS Dhoniच्या प्रत्येक सामन्याला त्याचे चाहते मोठ्या संख्येने उपस्थित राहत आहेत.
मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवरही तेच चित्र दिसले. इथे मुंबई इंडियन्सचे पाठिराखे कमी तर CSKच्या पिवळ्या जर्सीतील प्रेक्षक अधिक दिसले.
धोनी आज फलंदाजीला आला नसला तरी त्याच्या Dhoni Review System ने चाहत्यांची मनं जिंकली. CSK ने मुंबई इंडियन्सचे १५८ धावांचे लक्ष्य १८.१ षटकांत पार केले. रवींद्र जडेजा ( ३-२०), मिचेल सँटनर ( २-२८) आणि तुषार देशपांडे ( २-३१) यांनी चांगली गोलंदाजी केली.
अजिंक्य रहाणेने ७ चेंडूंत ७ चौकार व ३ षटकारांसह ६१ धावांची खेळी केली. शिवम दुबेने ( २८) ने ऋतुराजसह ४३ धावांची भागीदारी केली. अंबाती रायुडू ( २०*) व ऋतुराजने ( ४०*) चेन्नईला ७ विकेट्स राखून मॅच जिंकून दिली. या सामन्यानंतर धोनीने सर्वांची मनं जिंकणारी कृती केली.
मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर धोनीने फॅन्स विविध आशयाचे पोस्टर घेऊन मैदानावर आले होते... कुणी गर्लफ्रेंडसोबत डेट सोडून माहीसाठी आला होता, तर कुणी कॅप्टन कूलला शेवटचं आयपीएल खेळताना पाहायला आलेला. धोनीने सामन्यानंतर वानखेडे स्टेडियमच्या ग्राऊंड्समन्ससोबत फोटो काढले अन् त्यांना ऑटोग्राफही दिले.