Join us  

IPL 2023: IPLमध्ये बनली जखमी खेळाडूंची प्लेईंग-११, अशी टीम जी भल्याभल्या संघांना पाजू शकते पाणी

By ऑनलाइन लोकमत | Published: April 07, 2023 1:00 PM

Open in App
1 / 14

आयपीएलच्या १६ व्या हंगामाला सुरुवात होऊन नुकताच एक आठवडा झाला आहे. मात्र याचदरम्यान दुखापतीमुळे अनेक खेळाडू स्पर्धेबाहेर पडले आहेत. दुखापतग्रस्त होऊन संघाबाहेर पडलेल्या खेळाडूंची संख्या एवढी आहे की, त्यांच्यामधून एक प्लेईंग ११ तयार होईल. या प्लेईंग इलेव्हनमध्ये एकापेक्षा एक दिग्गज खेळाडू आहेत. त्यांची यादी पुढीलप्रमाणे.

2 / 14

आयपीएलमध्ये पंजाब किंग्सकडून खेळणारा इंग्लंडचा सलामीवीर जॉनी बेयरस्टो गतवर्षी सप्टेंबरमध्ये गोल्फ खेळताना जखमी झाला होता. तेव्हापासून बेयरस्टो क्रिकेटच्या मैदानापासून दूर आहे. दुखापातीमुळे त्याला आयपीएलमध्येही खेळता आलं नाही. पंजाबने त्याच्या जागी मॅथ्यू शॉर्टचा संघात समावेश केला आहे.

3 / 14

दुखापतीमुळे आरसीबीचा धडाकेबाज फलंदाज रजत पाटीदार आयपीएलमधून बाहेर पडला आहे. गेल्या आयपीएलमध्ये १५३ च्या स्ट्राईक रेटने ३३३ धावा कुटत तो चर्चेत आला होता. तसेच एलिमिनेटरमध्ये त्याने शतकी खेळी केली होती.

4 / 14

न्यूझीलंडचा धडाकेबाज फलंदाज केन विल्यमसनला आयपीएलमधील सलामीच्या सामन्यात झेल टिपताना जबर दुखापत झाली. त्याचा गुडघा दुखावला गेला. त्यामुळे त्याला आयपीएलमधून बाहेर पडावे लागले. त्याबरोबरच यावर्षी होणाऱ्या वनडे वर्ल्डकपमधूनही तो बाहेर पडण्याची. शक्यता आहे. त्याच्या जागी दसून शणाकाचा गुजरातच्या संघात समावेश करण्यात आला आहे.

5 / 14

पाठीला झालेल्या दुखापतीमुळे श्रेयस अय्यर आयपीएल २०२३ मधून बाहेर पडला आहे. त्याच्या जागी केकेआरने नितीश राणाकडे कप्तानी सोपवली आहे. आता श्रेयसच्या पाठीवर शस्त्रक्रिया होणार आहे. त्यामुळे तो वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमधूनही बाहेर पडण्याची शक्यता आहे.

6 / 14

भारताचा आघाडीचा दिग्गज यष्टीरक्षक रिषभ पंतला जबरदस्त अपघात झाला होता. त्यामुळे तो यंदाच्या आयपीएलला मुकला आहे. रिषभ पंचतच्या अनुपस्थितीत डेव्हिड वॉर्नरकडे दिल्ली कॅपिटल्सचं नेतृत्व सोपवण्यात आलं आहे. तसेच पंतच्या जागी अभिषेक पोरेल याचा संघात समावेश करण्यात आला आहे.

7 / 14

अष्टपैलू विल जॅक्सल आरसीबीने मोठ्या अपेक्षेने संघात समाविष्ट केले होते. मात्र इंग्लंडचा संघ बांगलादेशच्या दौऱ्यावर गेला असताना तो दुखापतग्रस्त झाला. या दुखापतीमुळे तो आयपीएलमधूनही बाहेर पडला आहे. त्याच्या जागी आरसीबीने मायकेल ब्रेसवेलला संघात समाविष्ट केले आहे.

8 / 14

आयपीएलच्या २०२३ मधील लिलावामध्ये चेन्नई सुपरकिंग्सने काइल जेमिन्सनला १ कोटी रुपयांना खरेदी केले होते. मात्र पाठीला झालेल्या दुखापतीमुळे तो आयपीएलमधून बाहेर पडला आहे. त्याच्या जागी चेन्नईने सिसांडा मगाला याला संघात घेतले आहे.

9 / 14

आरसीबीकडून खेळणारा इंग्लंडचा वेगवान गोलंदाज रीस टोप्ली याला मुंबई इंडियन्सविरुद्धच्या सामन्यात क्षेत्ररक्षण करताना दुखापत झाली होती. त्यामुळे तो आयपीएलमधून बाहेर पडला आहे.

10 / 14

गेल्या काही महिन्यांपासून दुखापतीशी झगडत असलेला स्टार वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह हा आयपीएल खेळणार नसल्याचे स्पष्ट झाल्यानंतर मुंबई इंडियन्सला जबर धक्का बसला आहे. दरम्यान, बुमराह वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप आणि आशिया कपमधूनही बाहेर पडण्याची शक्यता आहे.

11 / 14

जसप्रीत बुमराहबरोबरच मुंबईचा आणखी एक गोलंदाज झाय रिचर्डसन हा आयपीएलमधून बाहेर पडला आहे. त्याच्या जागी मुंबईने रिले मेडेरिथ याला संघात घेतले आहे.

12 / 14

वेगवान गोलंदाज प्रसिद्ध कृष्णा स्ट्रेस फ्रॅक्चरमुळे बऱ्याच दिवसांपासून क्रिकेटच्या मैदानातून दूर आहे. राजस्थानला त्याची उणीव भासत आहे. त्याच्या जागी राजस्थानने संदीप शर्माला संघात घेतले आहे.

13 / 14

याशिवाय चेन्नई सुपरकिंग्सचा वेगवान गोलंदाज मुकेश चौधरी, पंजाब किंग्सचा अष्टपैलू राज अंगद बावा हेही संघातून बाहेर झाले आहेत. चेन्नईने मुकेश चौधरीच्या जागी आकाश सिंह याला संघात घेतले आहे. तर पंजाबने राज बावाच्या जागी गुरनूर सिंह याला संघात स्थान दिले आहे.

14 / 14

जखमी खेळाडूंची प्लेईंग -११ - रजत पाटीदार, जॉनी बेयरस्टो, केन विल्यमसन (कर्णधार), श्रेयस अय्यर, रिषभ पंत (यष्टीरक्षक), विल जॅक्स, काइल जेमिन्सन, रीस टॉप्ली, जसप्रित बुमराह, प्रसिद्ध कृष्णा, झाय रिचर्डसन इम्पॅक्ट प्लेअर - राज अंगद बावा, मुकेश चौधरी.

टॅग्स :आयपीएल २०२३केन विल्यमसनजसप्रित बुमराहटी-20 क्रिकेट
Open in App