इंडियन प्रीमिअर लीग २०२३ च्या पहिल्या सामन्यात गतविजेता गुजरात टायटन्स आणि माजी विजेता चेन्नई सुपर किंग्स भिडणार आहेत. ४१ वर्षीय धोनी हा यंदाच्या आयपीएलमधील सर्वात वयस्कर खेळाडू ठरला आहे.
धोनी हा आयपीएलमध्ये कर्णधार म्हणून १०० विजय मिळवणारा एकमेव खेळाडू आहे आणि त्याने CSK ला चार जेतेपदं जिंकून दिली आहेत. महेंद्रसिंग धोनीने २३४ आयपीएल सामन्यांत ४९७८ धावा केल्या आहेत आणि १३५ झेल व ३९ स्टम्पिंग केले आहेत.
महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली CSK ने २०१०, २०११, २०१८ आणि २०२१ मध्ये जेतेपदं पटकावली आहेत. मागच्या पर्वात CSK ला ९व्या क्रमांकावर समाधान मानावे लागले होते. त्यामुळे धोनीने पुन्हा नेतृत्वाची जबाबदारी आपल्या खांद्यावर घेतली आहे.
धोनीच्या नेतृत्व कौशल्याबद्दल सारेच भरभरून बोलतात आणि त्याने त्याच्या कर्तृत्वातून ते सिद्धही करून दाखवले आहे. आयसीसीच्या तीन ( ट्वेंटी-२० वर्ल्ड कप, वन डे वर्ल्ड कप आणि चॅम्पियन्स ट्रॉफी) ट्रॉफी जिंकणारा तो जगातील एकमेव कर्णधार आहे.
अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर महेंद्रसिंग धोनीचीच भुरळ पडलेली दिसतेय... यजमान गुजरात टायटन्सपेक्षा चेन्नई सुपर किंग्सच्या पिवळ्या जर्सीतील प्रेक्षकांची संख्या अधिक दिसतेय.
एका फॅनने तर गर्लफ्रेंड की धोनी यामध्ये धोनीची निवड केली.