IPL 2023: मुंबई इंडियन्सने १७.५ कोटींत अष्टपैलू खेळाडू घेतला, पण तो फक्त फलंदाज म्हणून खेळणार; जाणून घ्या कारण

IPL 2023: इंडियन प्रीमिअर लीग २०२३ चा हंगाम सुरू होण्यापूर्वी मुंबई इंडियन्सला मोठा झटका बसला आहे.

IPL 2023: इंडियन प्रीमिअर लीग २०२३ चा हंगाम सुरू होण्यापूर्वी मुंबई इंडियन्सला मोठा झटका बसला आहे. ज्या खेळाडूला मुंबईने IPL 2023 च्या लिलावात सर्वाधिक १७.२५ कोटी रुपयांना विकत घेतले होते, तो मुंबई इंडियन्ससाठी गोलंदाजी करू शकणार नाही.

क्रिकेट ऑस्ट्रेलियाने मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत की युवा अष्टपैलू कॅमेरून ग्रीन ( Cameron Green) १३ एप्रिलपर्यंत गोलंदाजी करू शकणार नाही. टाइम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार क्रिकेट ऑस्ट्रेलियाच्या वर्कलोड मॅनेजमेंटच्या सूचनेनुसार ग्रीन १३ एप्रिलपर्यंत मुंबई इंडियन्ससाठी केवळ फलंदाजी करेल.

बीसीसीआयने गेल्या रविवारी काढलेल्या आदेशानंतर आयपीएल फ्रँचायझी आधीच संभ्रमात आहेत. खेळाडूंमधील दुखापतींच्या वाढत्या समस्या लक्षात घेऊन बोर्डाने NCA ला खेळाडूंच्या फिटनेसवर लक्ष ठेवण्यासाठी आणि IPL 2023 दरम्यान कामाचा ताण व्यवस्थापित करण्यासाठी IPL फ्रँचायझींसोबत काम करण्यास सांगितले आहे.

२३ वर्षीय ऑस्ट्रेलियन युवा अष्टपैलू खेळाडूला दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या तिसऱ्या कसोटी सामन्यादरम्यान बोटाला दुखापत झाली होती, ज्यामुळे तो बाहेर पडला होता. सध्या तो आपल्या बोटाची काळजी घेत आहे.

या अहवालात असा दावा करण्यात आला आहे की, BCCI ने क्रिकेट ऑस्ट्रेलियाच्या मार्गदर्शक तत्त्वांबद्दल सर्व फ्रँचायझींना आधीच सांगितले होते. लिलावाच्या दिवशी सकाळी, BCCI, CEO आणि IPL COO हैमांग अमीन यांनी १० फ्रँचायझींना पत्र पाठवले, "क्रिकेट ऑस्ट्रेलियाने कळवले की कॅमेरून ग्रीन पूर्ण हंगामासाठी उपलब्ध असेल. भारताविरुद्धच्या बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीच्या चारही कसोटी सामन्यांमध्ये तो खेळला, तर ग्रीन ९ ते १३ मार्च या कालावधीत होणाऱ्या चौथ्या कसोटीच्या समाप्तीपासून चार आठवडे गोलंदाजी करू शकणार नाही.''

मुंबई इंडियन्सचा संघ - रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव, इशान किशन, जसप्रीत बुमाराह , जोफ्रा आर्चर, टीम डेव्हिड. डेवॉल्ड ब्रेव्हिस, जसप्रीत बुमराह, हृतिक शोकिन, अर्जुन तेंडुलकर, अर्शद खान, तिलक वर्मा, जेसन बेहरेनडॉर्फ, कुमार कार्तिकेया, आकाश माधवाल, त्रिस्तान स्तब्स, रमणदीप सिंग, कॅमेरून ग्रीन, झाय रिचर्डसन, राघव गोयल