Join us

Big players in IPL 2022 auction: लोकेश राहुल, डेव्हिड वॉर्नर, शिखर धवन आदी मोठी नावं आयपीएल 2022 लिलावात भाव खाणार; फ्रँचायझींचं बजेट कोलमडणार!

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 1, 2021 00:38 IST

Open in App
1 / 9

Indian Premier League 2022 Retention Live Updates : इंडियन प्रीमिअर लीगच्या ( IPL 2022) पुढील पर्वासाठी 8 फ्रँचायझींनी त्यांच्या रिटेन ( कायम राखलेल्या) खेळाडूंची यादी जाहीर केली. लोकेश राहुल, हार्दिक पांड्या, डेव्हिड वॉर्नर, जोफ्रा आर्चर, बेन स्टोक्स, राशिद खान, कागिसो रबाडा, जॉनी बेअरस्टो ही काही मोठी नावं रिटेन केलेल्या खेळाडूंच्या यादीतून गायब झालेली पाहायला मिळाली. त्यामुळे IPL 2022 Mega Auction मध्ये यापैकी कुणीतरी मोठी रक्कम पटकावेल यात शंका नाही.

2 / 9

पंजाब किंग्सनं कर्णधार लोकेश राहुलला रिटेन केलेलं नाही. त्यानं आयपीएलमध्ये 94 सामन्यांत 3273 धावा केल्या आहेत आणि त्यात दोन शतकं व 27 अर्धशतकांचा समावेश आहे.

3 / 9

आयपीएल इतिहासात सर्वाधिक धावा करणाऱ्या खेळाडूंमध्ये दुसऱ्या स्थानावर असलेल्या शिखर धवनला दिल्ली कॅपिटल्सनं रिलिज केलं. त्याच्या नावावर 5784 धावा आहेत.

4 / 9

दुखापतीतून कमबॅक करणाऱ्या श्रेयस अय्यरनं नुकतंच दणक्यात टीम इंडियाच्या कसोटी संघात पदार्पण केलं. त्यालाही दिल्ली कॅपिटल्सनं वगळलं. त्यानं 87 सामन्यांत 16 अर्धशतकांसह 2375 धावा आहेत.

5 / 9

ऑस्ट्रेलियाचा स्टार खेळाडू डेव्हिड वॉर्नर हा लिलावात अधिक भाव खाऊन जाईल. सनरायझर्स हैदराबादनं त्याला रिलिज केलं. त्यानं 150 सामन्यांत 5449 धावा केल्या आहेत. त्यात 4 शतकं व 50 अर्धशतकं आहेत.

6 / 9

सनरायझर्स हैदराबादनं फिरकीपटू राशिद खानला रिलिज करून सर्वांना आश्चर्याचा धक्का दिलाय.

7 / 9

दिल्ली कॅपिटल्सनं अनुभवी गोलंदाज आर अश्विन यालाही वगळलं. त्यानं आयपीएल 2021त 13 सामन्यांत 7 विकेट्स घेतल्या होत्या.

8 / 9

मुंबई इंडियन्सनं हार्दिक व कृणाल या पांड्या बंधूना बाकावर बसवले.

9 / 9

या खेळाडूंव्यतिरिक्त जोफ्रा आर्चर, बेन स्टोक्स, दीपक हुडा, शार्दूल ठाकूर, कागिसो रबाडा, इशान किशन, भुवनेश्वर कुमार, जॉनी बेअरस्टो, दिनेश कार्तिक, सुरेश रैना, मोहम्मद शमी आदी तगडे खेळाडू लिलावासाठी उपलब्ध झाले आहेत.

टॅग्स :आयपीएल २०२१डेव्हिड वॉर्नरलोकेश राहुलशिखर धवन
Open in App