Join us  

Suryakumar Yadav IPL 2022, MI vs RR Live Updates : Umpire च्या निर्णयाचा मुंबई इंडियन्सला फायदा; Akash Ambani झाले खूश; सूर्यकुमारची कृती ठरली हिट!

By ऑनलाइन लोकमत | Published: April 30, 2022 10:48 PM

Open in App
1 / 8

IPL 2022, Mumbai Indians vs Rajasthan Royals Live Updates : मुंबई इंडियन्सच्या गोलंदाजांनी शनिवारी राजस्थान रॉयल्सविरुद्धच्या लढतीत चांगली कामगिरी केली. सुरुवातीच्या षटकांत RRच्या सलामीवीरांचे झेल सोडल्यानंतरही MIच्या गोलंदाजांनी दमदार पुनरागमन केले. पण, सलामीवीर रोहित शर्मा व इशान किशन पुन्हा अपयशी ठरले.

2 / 8

इशानने दुहेरी आकडा गाठला तरी, रोहित २ धावांवरच बाद झाला. सूर्यकुमार यादवने ( Suryakumar Yadav) चांगली फटकेबाजी केली आणि नशिबाचीही त्याला साथ मिळाली. चेंडू यष्टींवर आदळून सूर्यकुमार यादव LBW असल्याचे स्पष्ट दिसत होते, परंतु मैदानावरील अम्पायरच्या कृपेने तो नाबाद राहिला.

3 / 8

इशान किशनने थर्ड मॅनला षटकार खेचून MIच्या चाहत्यांना आश्वासक चित्र दाखवले, परंतु तिसऱ्याच षटकात आर अश्विनला गोलंदाजीला आणून RR ने मोठा डाव खेळला. अश्विनने फिरकीच्या जाळ्यात रोहितला अडकवले आणि डॅरील मिचेलने सोपा झेल घेत त्याला २ धावांवर माघारी पाठवले. किशन १८ चेंडूंत २६ धावा करून ट्रेंट बोल्टच्या गोलंदाजीवर संजू सॅमसनच्या हाती झेल देऊन माघारी परतला.

4 / 8

सूर्यकुमार यादवने मुंबई इंडिन्ससाठी खिंड लढवली. ८व्या षटकात युजवेंद्र चहलने त्याला LBW केले होते, पण मैदानावरील अम्पायरने नाबाद दिले. चहलने त्वरित DRS घेतला आणि त्यात चेंडू बॅटच्या संपर्कात न येता पॅडवर आदळलेली दिसला. त्यानंतर तो चेंडू यष्टींवर आदळत असल्याचे दिसले, परंतु चेंडू निम्म्यापेक्षा जास्त बेल्सच्या वर असल्याने Umpires Call दिला गेला व सूर्या नाबाद राहिला.

5 / 8

मुंबई इंडियन्सकडून आयपीएलमध्ये २००० धावा पूर्ण करणाऱ्या सूर्याला जीवदान मिळालेले पाहून MIच्या डग आऊटमध्ये सुटकेचा निश्वास टाकला गेला, तर मालक आकाश अंबानी यांनी टाळ्या वाजवून निर्णयाचे स्वागत केले. चहल मात्र भडकला अन् त्याला शांत करण्यासाठी सूर्यकुमारने मिठी मारली.

6 / 8

7 / 8

8 / 8

रियान पराग ( ३) अपयशी ठरल्यानंतर आर अश्विनने ९ चेंडूंत २१ धावा करून योगदान दिले. शिमरोन हेटमायरने १४ चेंडूंत ६ धावा केल्याने RRच्या धावा कमी राहिल्या. रिले मेरेडिथने अखेरचे षटक चांगले फेकले, अश्विनच्या विकेटसह त्याने केवळ ३ धावा दिल्या. राजस्थानला ६ बाद १५८ धावाच करता आल्या. मरेडिथने दोन व हृतिक शोकीनने दोन विकेट्स घेतल्या.

टॅग्स :आयपीएल २०२२सूर्यकुमार अशोक यादवआकाश अंबानीयुजवेंद्र चहलमुंबई इंडियन्स
Open in App