Join us

IPL 2021 in UAE 7 new rules : आयपीएल २०२१च्या दुसऱ्या टप्प्यातील ७ नवीन नियम, जे प्रत्येकाला माहीत असायलाच हवेत!

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 8, 2021 15:07 IST

Open in App
1 / 7

खेळाडूंचे कुटुंबीय व फ्रंचायझी मालक यांना बायो बबलमध्येच रहावे लागेल - आयपीएल २०२१च्या दुसऱ्या टप्प्यासाठी तयार करण्यात आलेले बायो बबल हे केवळ खेळाडूंसाठीच नसेल तर त्यांच्यासोबत आलेल्या कुटुबियांना व फ्रँचायझी मालकांनाही त्यात रहावे लागणार आहे. अत्यावश्यक असेल तरच त्यांना या बायो बबलमधून बाहेर जाता येईल आणि तेव्हा त्यांना बीसीसीआयच्या मुख्य वैद्यकिय अधिकाऱ्याची परवानगी घ्यावी लागेल.

2 / 7

संघ ज्या हॉटेलमध्ये थांबलाय, तेथे कोणालाच प्रवेश नाही - फ्रँचायझींनी आपापल्या खेळाडूंसाठी स्वतंत्र हॉटेल्स व रिसॉर्ट्स बूक केले आहेत. पण, तेथे त्यांना चाहत्यांचा किंवा अन्य व्यक्तिंकडून त्रास होऊ नये, यासाठी खेळा़डूंसाठी संपूर्ण हॉटेल किंवा विंग बूक केली गेली आहे. तेथे खेळाडू व त्यांच्या कुटुंबीयांशिवाय कोणालाच परवानगी नसणार आहे.

3 / 7

बायो बबल मॅनेजर - कोणाकडूनही बायो बबल नियमांचे उल्लंघन होऊ नये यासाठी चार सदस्यीय ‘Bubble Integrity Managers’ तयार करण्यात आले आहे. या समितीची सर्व खेळाडू व सपोर्ट स्टाफ यांच्यावर करडी नजर असणार आहे.

4 / 7

चेंडू बदलला जाणार - चेंडू स्टँडमध्ये किंवा मैदानाबाहेर गेल्यास तो बदलला जाईल.

5 / 7

खेळाडूंसाठी हॉटेलमध्ये स्वतंत्र चेक इन काऊंटर असणार आहे.

6 / 7

बायो बबलमध्ये दाखल होण्यापूर्वी तीनवेळा RT-PCR टेस्ट करणे अनिवार्य आहे. या सर्व टेस्ट निगेटिव्ह आल्यास बायो बबलमध्ये प्रवेश करता येईल

7 / 7

इंग्लंड दौऱ्यावर असेलेले खेळाडू आयपीएलसाठी थेट लंडनहून यूएईत येणार आहेत. ते आधीच एका बायो बबलमध्ये आहेत, त्यामुळे त्यांना आयपीएलच्या बायो बबलमध्ये थेट प्रवेश मिळेल आणि त्यांना आयसोलेशनमध्ये रहावे लागणार नाही.

टॅग्स :आयपीएल २०२१बीसीसीआयसंयुक्त अरब अमिराती
Open in App