Join us  

IPL 2021: सूर्यकुमार यादव कॉलेजमध्येच 'डान्स कोच'च्या सौंदर्यावर झाला होता 'क्लीन बोल्ड', पाहा दोघांची Love Story

By ऑनलाइन लोकमत | Published: April 29, 2021 6:07 PM

Open in App
1 / 10

आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सकडून दमदार कामगिरी करत स्वत:ची योग्यता सिद्ध केल्यानंतर सूर्यकुमार यादवनं भारतीय संघाकडूनही पदार्पण केलं. सूर्यकुमारनं आजवर त्याच्या करिअरमध्ये अनेक चढउतार पाहिले आहेत आणि या प्रवासात त्याच्यासोबत होती त्याची पार्टनर म्हणजेच त्याची पत्नी देविशा शेट्टी

2 / 10

सूर्यकुमार यादवची लव्ह स्टोरी देखील एकदम हटके आहे. ही तेव्हाची गोष्ट आहे जेव्हा सूर्यकुमार कुणी फेमस क्रिकेटपटू नव्हता. तो कॉलेजमध्ये असतानाचं सूर्यकुमार आणि देविशा यांचं प्रेम आहे.

3 / 10

सूर्यकुमार मुंबईच्या पोतदार कॉलेज ऑफ कॉमर्स अँड इकोनॉमिक्स महाविद्यालयात शिक्षण घेत होता. तेव्हा त्याची भेट देविशासोब झाली. देविशा तेव्हा कॉलेजमध्ये उत्तम डान्सर म्हणून लोकप्रिय होती.

4 / 10

देविशाच्या नृत्यावर सूर्यकुमार भाळला आणि तिच्या प्रेममात पडला. इथूनच दोघांच्या प्रेम कहाणीला सुरुवात झाली. देविशा एका दाक्षिणात्य कुटुंबातून आली आहे. तिचा जन्म मुंबईत १७ नोव्हेंबर १९९३ रोजी झाला होता.

5 / 10

कॉलेजमध्ये असताना वयाच्या २२ व्या वर्षी सूर्यकुमार १९ वर्षीय देविशाच्या प्रेमात पडला आणि दोघांनीही हे प्रेम अनेक वर्ष निभावलं.

6 / 10

देविशानं २०१३ ते २०१५ पर्यंत एका एनजीओमध्ये काम सुद्धा केलं. देविशाला पर्यटन आणि स्वयंपाकाची देखील खूप आवड आहे. तर सूर्यकुमार मुळचा वाराणासीचा आणि वडिलांच्या कामानिमित्त त्याचे कुटुंब मुंबईत वास्तव्यास आलं. मुंबईतच सूर्यकुमारनं शिक्षण पूर्ण केलं.

7 / 10

काही वर्षांपर्यंत दोघं एकमेकांना डेट करत होते आणि १९ मई २०१६ रोजी दोघांचा साखरपुडा झाला. पुढे ७ जुलै २०१६ रोजी दोघं मोजक्या कुटुंबियांच्या उपस्थितीत विवाहबद्ध झाले.

8 / 10

सोशल मीडियावर दोघांनाही अनेकदा एकमेकांसोबतचे फोटो शेअर करताना पाहिलं आहे. देविशा अनेकदा सूर्यकुमारला प्रोत्साहन देण्यासाठी स्टेडियममध्ये देखील उपस्थित राहिल्याचं आपण पाहिलं आहे.

9 / 10

देविशानं सूर्यकुमारवरील प्रेमापोटी त्याच्या नावाचा टॅटू देखील गोंदवला आहे.

10 / 10

इतकंच काय तर सूर्यकुमारने वरातीसाठी २८ लाख रुपयांची कार खरेदी केली होती असं सांगितलं जातं आणि त्या कारवर १० लाखांचा खर्च करुन तिला देविशाच्या आवडीचा पिवळा रंग दिला होता.

टॅग्स :आयपीएल २०२१सूर्यकुमार अशोक यादवमुंबई इंडियन्स