Join us

IPL 2021: धोनी असो किंवा विराट अन् रोहित सर्वांनी केलं नाराज, 'या' संघाला मिळाले १०० पैकी १०० गुण!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 15, 2021 18:04 IST

Open in App
1 / 9

तुम्ही जर आयपीएलचं सध्याचं सीझन अगदी पहिल्या सामन्यापासून पाहत असाल तर तुमचं लक्ष एका गोष्टीनं हमखास वेधून घेतलं असेल. ते म्हणजे आयपीएलमध्ये यंदा संघांकडून होत असलेले खराब क्षेत्ररक्षण आणि सुटलेले झेल.

2 / 9

आयपीएलच्या यंदाच्या सीझनला ९ एप्रिलपासून सुरुवात झाली. पहिल्याच सामन्यात कोहलीच्या रॉयल चॅलेंजर्सं बंगळुरू संघाकडून तब्बल ६ झेल सुटले. इतकंच काय तर कर्णधार विराट कोहलीकडूनही एक सोपा झेल सुटला होता.

3 / 9

खराब क्षेत्ररक्षणाचा हा व्हायरस हळूहळू इतर संघांमध्येही पसल्याचं दिसून येत आहे. कारण महेंद्रसिंग धोनीच्या चेन्नई सुपरकिंग्ज संघाकडूनही यंदा खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळाला. तर मुंबई इंडियन्सच्या खेळाडूंकडूनही झेल सुटलेले पाहायला मिळाले.

4 / 9

क्षेत्ररक्षणाच्या बाबतीत परीक्षा घ्यायची झाली तर यंदाच्या सीझनमध्ये आतापर्यंत झालेल्या सामन्यांच्या आकडेवारीनुसार आठ संघांपैकी एकूण सात संघ नापास ठरतील. पण एका संघाला क्षेत्ररक्षणाच्या बाबतीत १०० पैकी १०० गुण द्यावे लागतील.

5 / 9

आयपीएलच्या यंदाच्या सीझनमध्ये उत्तम क्षेत्ररक्षणासाठी लक्षवेधी ठरलेला संघ म्हणजे सनरायझर्स हैदराबाद. डेव्हिड वॉर्नरच्या नेतृत्वाखालील या संघाला गेल्या दोन सामन्यांमध्ये १३ वेळा झेल टिपण्याची संधी मिळाली आणि संघाच्या खेळाडूंनी यातील एकही झेल सुटू दिलेला नाही.

6 / 9

सनरायझर्स हैदराबाद संघानं सुरुवातीचे दोन्ही सामने गमावले असले तरी जबरदस्त क्षेत्ररक्षणानं संघानं लक्ष वेधून घेतलं आहे.

7 / 9

कोलकाता नाइट रायडर्स विरुद्धच्या सामन्यात सनरायझर्स हैदराबाद संघाला झेल टिपण्याच्या ५ संधी मिळाल्या आणि संघातील खेळाडूंनी हे पाचही झेल यशस्वीरित्या टिपले आहेत. यात अब्दुल समद यानं दोन झेल टिपले. तर वृद्धीमान साहा, मनिष पांडे आणि विजय शंकर यांच्या खात्यात प्रत्येकी एक झेल आहे.

8 / 9

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू विरुद्धच्या सामन्यात हैदराबादच्या खेळाडूंना झेल टिपण्याच्या ८ संधी मिळाल्या आणि यातील ७ झेल यशस्वीरित्या टिपले गेले.

9 / 9

हैदराबादकडून यावेळी शाहबाज नदीम, राशिद खान, डेव्हिड वॉर्नर आणि विजय शंतर यांनी प्रत्येकी एक झेल टिपला. तर मनिष पांडे आणि साहा यांनी प्रत्येकी दोन झेल टिपले.

टॅग्स :सनरायझर्स हैदराबादडेव्हिड वॉर्नरआयपीएल २०२१रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरमहेंद्रसिंग धोनीविराट कोहली