Join us

IPL 2021 : MI vs DC सामन्यात रितिकी, नताशा यांची उपस्थिती, पण चर्चा मात्र 'या' नव्या चेहऱ्याची!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 21, 2021 08:15 IST

Open in App
1 / 12

प्रथम फंलदाजीला आलेल्या मुंबई इंडियन्सकडून रोहित शर्मा ( ४४), सूर्यकुमार यादव ( २४), इशान किशन ( २६) व जयंत यादव ( २३) यांनी सुरेख खेळ केला. हार्दिक पांड्या व कृणाल पांड्या हे चुकीचे फटके मारून माघारी परतले.

2 / 12

अमित मिश्रानं अनुभव पणाला लावताना मुंबईच्या फलंदाजांना नाचवले. त्यानं २४ धावांत ४ विकेट्स घेतल्या. MIविरुद्ध DCच्या गोलंदाजानं केलेली ही सर्वोत्तम वैयक्तिक कामगिरी ठरली. आवेश खाननं २ षटकांत १५ धावांत २ विकेट्स घेतल्या.

3 / 12

लक्ष्याचा पाठलाग करताना शिखर धवन ( ४५), स्टीव्ह स्मिथ ( ३३), ललित यावद ( २२*) आणि शिमरोन हेटमायर ( १४) यांनी त्यांची जबाबदारी चोख पार पाडली. मुंबई इंडियन्सचे ९ बाद १३७ धावांचे आव्हान दिल्लीनं १९.१ षटकांत ४ बाद १३८ धावा करून सहज पार पाडले.

4 / 12

कोरोना व्हायरसमुळे प्रेक्षकांना स्टेडियममध्ये संधी नसली तरी फ्रँचायझीच्या कुटुंबीयांना बायो बबलमध्ये राहुन सामन्याची मजा लुटता येत आहे. त्यामुळेच मुंबई इंडियन्सच्या सामन्यात रोहित शर्माची पत्नी, रितिका सजदेह, हार्दिक पांड्याची पत्नी नसाशा स्टँकोव्हिच व कृणाल पांड्याची पत्नी पंखुडी या उपस्थित असतात.

5 / 12

पण, मंगळवारी दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या सामन्यात नव्या चेहऱ्यानं सर्वांचे लक्ष वेधले. दिल्ली कॅपिटल्सच्या प्रेक्षकांमध्ये ती दिसली. DCचे मालक पार्थ जिंदाल यांचे कुटुंबीय उपस्थित होते.

6 / 12

पार्थ जिंदाल यांची पत्नी अनुश्री यांनी सर्वांचे लक्ष वेधले. DCच्या खेळाडूंना चिअर करणाऱ्या अनुश्री जिंदाल याही सामन्यादरम्यान चर्चेचा विषय ठरल्या होत्या.

7 / 12

आयपीएल २०२०तही त्यांनी सर्वांचे लक्ष वेधले होते.

8 / 12

पार्थ आणि अनुश्री यांनी 2016 मध्ये विवाह केला. त्यांना एक वर्षांची मुलगी आहे. एप्रिल 2019मध्ये त्यांना कन्यारत्न झाला.

9 / 12

10 / 12

11 / 12

12 / 12

टॅग्स :आयपीएल २०२१दिल्ली कॅपिटल्समुंबई इंडियन्स