डेव्हिड वॉर्नरच्या नेतृत्वाखाली २०१६मध्ये सनरायझर्स हैदराबादनं आयपीएलचे पहिले जेतेपद पटकावले. त्याशिवाय अनेक विक्रमांनाही गवसणी घातली. २०२१च्या सहा सामन्यांतील खराब निकालामुळे त्याच्याकडून प्रथम कर्णधारपद काढून घेतले गेले आणि आज त्याला अंतिम ११मध्येही स्थान दिले नाही.
डेव्हिड वॉर्नरला खेळाडूंसाठी पाणी घेऊन जाताना दिसला. कधी तो फलंदाजासाठी हेल्मेट घेऊन धावत होता. संपूर्ण संघाला आपल्या तालावर नाचवणारा वॉर्नर आज फलंदाजांच्या तालावर नाचत होता. त्याचा हा अवतार पाहून नेटिझन्सनच्या डोळ्यांतही पाणी आले.
सनरायझर्स हैदराबादकडून सर्वाधिक ४०१२ धावांचा विक्रम डेव्हिड वॉर्नरच्या नावावर आहे. SRHसाठी सर्वाधिक १४३ षटकार, सर्वाधिक ५०.७८ची सरासरी, सर्वाधिक ५०+ धावा ( ४२) हे विक्रमही वॉर्नरनं केले आहेत.
आयपीएलच्या एकाच पर्वात ८४८ धावा, आयपीएलमध्ये सर्वाधिक ५४४७ धावा करणारा परदेशी खेळाडू, आयपीएलमध्ये सर्वाधिक ५० + ( ५४) धावा अन् अर्धशतकांचे अर्धशतक साजरा करणारा एकमेव फलंदाज, शिवाय २०१४, २०१५, २०१६, २०१७, २०१९ व २०२० वर्षी सर्वाधिक धावांचा विक्रमासह ऑरेंज कॅप पटकावणारा खेळाडू...